हिंगणघाट येथे दूधविक्रेत्यास चाकूचा धाक दाखवित लुटल्याची घटना

32

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.२९नोव्हेबर):-शहरातील उड़ाणपुलावरुन उपजिल्हा रुग्णालयाकड़े जाणाऱ्या महामार्गावर एका दूधविक्रेत्यास चाकूचा धाक दाखवित लुटल्याची घटना आज दि.२८ रोजी पहाटे घडली असून पोलिसांनी दोन चोरट्यास अवघ्या काही तासातच शोध घेण्यात यश मिळविले.जबरी चोरी करणारे नागपूर येथील सराईत गुन्हेगार असून त्यांनी स्थानिक रहिवासी राजु अशोक गौळकार रा.शास्त्री वार्ड हे राष्ट्रीय महामार्गावरील उड़ाणपुलावरुन पहाटे ४.३० वाजता उपजिल्हा रुग्णालयाकड़े जात असतांना अडविले,चाकुचा धाक दाखवित त्यांचेकडून २ हजार नगदी रोख रक्कम लुटली.

श्री गौळकार यांनी सदर घटनेची शहर पोलिसांत तक्रार केली असता हिंगणघाट ठाण्याचे डी. बी.पथकाने दोन संशयित इसमांना अटक करून त्यांचेकडुन टीवीएस स्कूटर क्रमांक एमएच ४९-बीए-३८१९ सह एकूण ७० हजार ५५० रू. चा मुद्देमाल जप्त केला.डीबी पथकाने शोध घेतला असता आरोपी रोहित उर्फ रितेश जग्गनाथ डेकाटे(१९) तसेच सायमन अंथोनी फ्रांसिस(१९) दोन्ही राहणार सुयोगनगर, अजनी,नागपुर यांना स्कूटरने नागपुरकड़े जातांना रिमडोह परिसरातून डीबी पथकाने ताब्यात घेतले.

पोलिस चौकशी दरम्यान सदर गुन्हयातील रोख रकम २ हजार तसेच इतर मुद्देमाल आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आला.सदर गुन्हयातील दोन्ही आरोपींची कसुन चौकशी केली असता, त्यांनी त्याच रात्रीचे सुमारास एअरपोर्ट चौक, नागपूर येथे चाकुचा धाक दाखवुन काही रक्कम व सोनी कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावील्याचे पोलिसांना सांगितले.

सदर दोन्ही आरोपी सराइत गुन्हेगार असून यांचेकड़े असलेली स्कूटरसुद्धा चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले.सदर मोपेड स्कूटर हरविली असल्याची तक्रारसुद्धा (बेलतरोड़ी) नागपुर पोलिसांत नोंद आहे.सदरची कारवाई ठाणेदार भानुदास पिदुरकर यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर,उमेश बेले यांनी केली आहे.