लॉकडाऊनच्या अफवेने फोटोग्राफर्सना अडचणीत येण्याची भीती

31

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड (माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.29नोव्हेंबर):-केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्याकडून राज्यात लॉकडाऊन हटवून हळूहळू अनलॉक प्रक्रिया चालू झाली असताना अचानक लॉकडाऊनच्या अफवेचे पेव फुटले असून फोटोग्राफर्समध्ये भीती निर्माण झाली आहे.

एक तर केंद्र सरकारने 22 मार्च रोजी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्वाचे स्टुडिओ बंद होते त्यांना घर खर्च भागविणे पण मुश्किल झाले होते पण या अफवेने त्यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली आहे.

लाखो रुपये खर्च करून धंध्यासाठीउच्च दर्जाचे कॅमेरे,लागणारे साहित्य असूनसुध्दा त्याचा काही मे महिन्यातील लग्नसराई सिजनला उपयोग झाला नाही.

पूर्ण सिजन वाया गेल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागला होता काही फोटोग्राफर्सनी तर आपला धंदा बदलला ,काही जणांचे स्टुडिओ बंद झाले त्यात आता तुलसी विवाहानंतर लग्नसराई जोरात होणार या आशेने सर्वजण तयारीला लागले.

सरकारच्या मदतीची कोणतीही अपेक्षा न करता सुरुवात केली पण या अफवेने फोटोग्राफर्स मध्ये भीती निर्माण झाली आहे लॉकडाऊन पुन्हा झाले तर काय?