निफाड तालुक्यातील देवपुर गावचे भुमीपुत्र श्री नितीन पुरुषोत्तम भालेराव शहीद

29

🔸शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार

✒️विजय केदारे(निफाड,विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

निफाड(दि.29नोव्हेंबर):-तालुक्यातील देवपुर गावचे भुमीपुत्र श्री नितीन पुरुषोत्तम भालेराव CRPF कोब्रा कमांङो यांचे छत्तीसगड रायपुर येथे नक्शलवाद्यांच्या बाॅम्ब स्फोटात विरगतीस प्राप्त झाले.शहीद नितीन भालेराव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे ,नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, पोलीस कमिशनर दीपक पांडेय, पोलीस उपायुक्त तांबे मोहन ठाकूर ,पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, अशोक भगत, विलास मुंढे यांनी वीर जवान नितीन भालेराव यांना शेवटचा सलाम केला.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे सुपुत्र शहीद नितीन भालेराव यांना राज्य शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने भारतमातेने वीर सुपुत्र गमावला आहे. अशा शब्दात त्यांनी भावना शोक संदेशात व्यक्त केल्या.शहीद भालेराव यांच्या अंत्यसंस्काराला परिसरातील जनसागर उपस्थित होता. जनतेच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले असले तरी भालेराव यांच्या देशभक्ती बाबत स्वाभिमानयुक्त चर्चा यावेळी होत होत्या.