महाविकास आघाडीची आज बूथ कमिटीची बैठक

    37

    ?औरंगाबाद पदविधर मतदार संघ निवडणूक – 2020

    ✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

    परळी(दि.30नोव्हेंबर):-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांच्या मतदान नियोजनासाठी आज बूथ कमिटीची बैठकीचे आयोजन करण्यात आलेया आहे.

    बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळी शहर पिंजून काढले असून, अतिशय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. परळी शहरात एकूण 7 बूथ असून 1 बूथ 100 युथ असे नियोजन या पूर्वीच बैठकीत करण्यात आले आहे.

    1 डिसेंम्बर ला मतदान असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी आज राष्ट्रवादी शहर कार्यालय,सुभेदार कॉम्प्लेक्स, येथे आज दि. 29 नोव्हेंबर,रविवार रोजी सकाळी 11 वाजता कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडी प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.