साहित्य क्षेत्राची छोटीशी सेवा करणाऱ्या मराठी साहित्य मंचचा दुसरा वर्धापनदिन थाटामाटात संपन्न

32

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.30नोव्हेंबर):-साहित्य क्षेत्रात सहीत्याची सेवा ‘ करून साहित्यिकांना साहित्याचा मार्ग दाखवणाऱ्या मराठी साहित्य मंच चा दुसरा वर्धापनदिन २३ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आला.जीवनाचा खरतड प्रवास काढून समुह निर्माते अंगद दराडे यांनी या समूहाची वयाच्या विसाव्या वर्षी निर्मिती केली व तो समुह आज महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात, सोशल मीडियाच्या माध्यमातून साहित्यिकांना साहित्याचा मार्ग दाखवन्याचा प्रयत्न करत आहे. कवी कवयित्री’चे त्यावर असेच स्नेह व सहकार्य राहिले तर भविष्यात त्यांना व्यासपीठ देखील नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन असे समूहाच्या वतीने सांगण्यात आले.

समुह निर्माते अंगद दराडे हे त्यांच्या आयुष्यात साहित्यापासून दुरावल्या सारखे झाले होते त्यावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन व आधार श्री. नरेंद्र मुरलीधर पाटील राहणार – धुळे, ता. जि. धुळे हल्ली मुक्काम – बेलापूर नवी मुंबई .यांचा आधार मिळाला व हळू, हळू साहित्य समुहाचे रोपटे वाढत गेले, नतंर त्यांच्याशी प्रा.रावसाहेब राशीनकर , नंदकुमार शेंदरे  व मराठी साहित्य सखी मंच ची जबाबदारी सांभाळणारी मोठी बहीण शालु ताई चे विशेष सहकार्य लाभले .मराठी साहित्य मंच कडून आज अनेकांचे लेख कविता साहित्य वृत्तपत्रात , अंकात , पुरवणी प्रकाशित होते पण मुळात समुह निर्माते यांचा साहित्य प्रवास खूपच खरतड झाल्यामुळे ग्रामीण भागातील साहित्यीकांसाठी साहित्य जोपासना करण्यासाठी समूहाची निर्मिती करण्यात आली होती.

🔹वर्धापनदिन ई काव्य पुरवणीचे करण्यात आले थाटामाटात प्रकाशन

मराठी साहित्य सखी मंच द्वितीय वर्धापनदिनानिमित्त व वर्धापनादिन विशेषांक प्रकाशन सोहळ्यासाठी समूह संस्थापक मा.अंगद दराडे, रावसाहेब सर , नंदकुमार शेंदरे , शालूताई कृपाले समवेत गुगल Meet द्वारे डिजिटल पद्धतीने ऑनलाईन वर्धापनदिन साजरा करण्यात आला.या सोहळ्याला सुत्रसंचलन चंदन ताई तरवंडे यांनी केलं नतंर शालूताईनी अतिशय सुंदर प्रस्तावना केली.

गुगल मीटवर ,कोमलताई, राजश्रीताई विद्याताई,, नंदू भाऊ रावसाहेब भाऊ ,सुनिषाताई , रूपालीताई ,ढवळेताई , स्वाती कावरे , बिबवे ताई , सायलीताई , अनुष्का ताई , अश्विनीताई अनेक सखी,दादाने सहभाग घेतला . राजश्री ताईने अतिशय सुंदर स्वागत गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले . तसेच ज्येष्ठ कवयित्री सुनिषाताईंनी खूप सक्रिय सहभाग घेऊन वर्धापनदिनाची शोभा वाढवली.नतंर साहित्य समूहात वर्धापनदिन विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले