पुसेगाव मधील व्यावसायिकांच्या वतीने श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट ला ऑटोमॅटिक सॅनिटायझर च्या 3 मशीन भेट

37

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.30नोव्हेंबर):-संपूर्ण जग कोरोना विषाणू चा सामना करीत आहे कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय म्हणून प्रत्येकाने हाताला सॅनिटायझर लावणे आवश्यक आहे.

यासाठी च पुसेगाव चे व्यवसायिक मंगल वस्त्र निकेतन चे मालक श्री सुश्रुत जाधव, वैशाली ज्वेलर्स चे मालक श्री सचिन भवर, जगदाळे ज्वेलर्स चे मालक श्री सुजित जगदाळे, सी लाई टेलर्स चे मालक श्री मनोज राऊत, मयूर फूट वेअर चे मालक श्री अमोल चव्हाण , गजानन ऑटो मोबाईल्स चे मालक श्री प्रवीण तिवाटने यांच्या कडून श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट ला ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आल्या.

याबद्दल त्यांचा सत्कार करताना मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन श्री मोहनराव जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.