देगलूर-बिलोली मतदार संघातील शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा द्या

36

🔹आ.रावसाहेब अंतापूरकर यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे केली मागणी

✒️महादेव उप्पे(देगलूर प्रतिनिधी)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.30नोव्हेंबर)-मागील दोन महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या ढगफुटी व अतिव्रष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे देगलूर बिलोली मतदार संघात नुकसान झालेले असताना इफको टोकीयो पिकविमा कंपनी फक्त अॉनलाईन तक्रार केलेल्या देगलूर येथील ५६२०३ शेतकऱ्यां पैकी ११९०० शेतकऱ्यांना व बिलोलो येथील ४५९३३पैकी ४७२१ शेतकऱ्यांना फायदा मिळाला आहे.

देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची भेट घेऊन आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगून पिक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा मंजूर करून देण्यात यावे .असे निवेदन देण्यात आले.