उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा तर्फे,”जागतिक एड्स दिवस” साजरा व एड्स विरोधी शपथ ग्रहण

28

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.2डिसेंबर):-दी.०१ डिसेंबर २०२० रोजी उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा तर्फे,”जागतिक एड्स दिवस” साजरा करण्यात आला. कोरोना मुळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार चन्द्रे, यांनी, जनजागृति फेरी न उपस्थित रुग्णांचे, सुरक्षित अंतर नियमन ठेवून प्रबोधन केले. या उपक्रमांतर्गत त्यांनी थोडक्यात, पण अत्यंत महत्वाची माहिती दिली. एड्सची लक्षणे सांगताना, ताप, कोरडा खोकला, घसा दुखणे, वजन कमी होणे, गिळताना त्रास, रात्री घाम येणे, शरीरावर लाल पुरळ, बध्दकोष्टी, वारंवार तोंड येणे व तोंडात पांढरे चट्टे येणे होय. याचा प्रसार हा मुख्यत्वे, असुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्ही संसर्गित रक्त आणि पदार्थ वापरल्याने, एचआयव्ही संसर्गित इंजेक्शन, सुया आणि उपकरण यांच्या वापरामुळे तसेच एचआयव्हीं संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या बाळाला संसर्ग होवू शकतो.

एड्सचां प्रसार हा, मच्छर चावल्याने, एकत्र जेवल्याने, एकच शौचालय कीवा कपडे वापरल्याने, एचआयव्ही संसर्गिताच्या जवळ बसल्याने, मिठी मारल्याने गालावर चुंबन घेण्याने, हात मिळवल्याने, एकत्र खेळल्याने, बस कीवा रेल्वे प्रवास, पोहण्याने,टेलिफोन, शिंक आणि खोकण्याने याचा प्रसार होत नाहीं. डॉ. ललितकुमार चन्द्रे, यांनी सांगीतले की,उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे, एचआयव्ही रुग्णांची मोफत तपासणी केली जाते.

तसेच एचआयव्हीं संसर्गित रुग्णाच्या तीन विशेष अधिकाराबाबत, सूचित सहमती, गोपनीयता तसेच भेदभाव याबाबत सांगीतले. तसेच एचआयव्ही संबंधित अधिक माहितीसाठी, त्यांनी, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा, साधन मदतकेंद्र ०२२२४११४०००, संवाद ०२०२६३८१२३४, दिशा, तसेच महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्याशी संपर्क करुन , आपल्या आरोग्याचे जतन करण्यासाठी आव्हाहन केलें. या प्रसंगी, वैद्यकिय अधिक्षक डॉ. ललितकुमार चन्द्रे, यांच्या सोबत उज्ज्वला मोरे, योगेश पावर, धीरज डोळे, सलमान खान, अमृत माळी, गजेंद्र नेरपगार, खंडेराव ईशी तसेच सर्व रुग्णालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते व सर्वांनी, एडस् विरोधी, शपथ घेतली.