चार्वाक वनाचे संस्थापक अध्यक्ष ,सत्यशोधक ॲड .अप्पाराव मैंद यांची झांन बौद्धभूमी चापर्डास भेट

    123

    ?बौध्द शिकवणीचा प्रचार आणि प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे – ॲड .अप्पाराव मैंद

    ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

    पुसद(दि.2डिसेंबर):-यवातमाळ – नागपूर महामार्गावर, यवतमाळ पासून ८ किलोमिटर अंतरावर , अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी नव्यानेच ‘ झांन बौद्धभूमी ‘ हे विपश्यना केंद्र आकार घेत असून लवकरच ते विदर्भातील प्रमुख बौद्धधम्म तिर्थ क्षेत्र म्हणून नावारूपास येईल.या केंद्राचे निर्माते भिक्षु डाॕ.अशोक बोधी असून निर्माण खर्च अशोक बोधीच करीत आहेत.पुर्वाश्रमीचे डाॕ.अशोक कांबळे, यवतमाळ येथील प्रसिद्ध वैद्यक असून त्यांनी दोन वर्षापूर्वीच बौद्ध भिक्षुची दीक्षा घेतली आणि आपली जवळपास २०० कोटीची मालमता झांन बौद्धभूमीला दान दिली आहे.

    झांन विपश्यना केंद्राचे उद्घघाटन दि.२९ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९ वा. भिक्षु संघाच्या उपस्थितीत आणि भिक्षु डॉ. खेमोधम्मो यांचे मार्गदर्शनाखाली झाले असून विपश्यनेच्या पहिल्या तुकडीचा सुभारंभ झाला आहे,आणि या पुढे सतत विपश्यनाच्या तुकड्या विनाखंड ध्यान साधना करीत राहतील अशी माहिती भिक्षु डाॕ.अशोक बोधी यांनी उद्घघाटन प्रसंगी दिली.उद्धघाटन सोहळ्यास आर्णीचे उद्धवराव भालेराव,त्यांच्या पत्नी उपासिका वनमालाताई,उपा.श्रीरामे आणि ॲड .अप्पाराव मैंद उपस्थित होते.शिबीरार्थीसोबत आम्ही एक सेशन ध्यानही केले.

    विश्रांतीच्या काळात भिक्षु डाॕ.अशोक बोधी यांनी आम्हाला झांन भूमी केंद्राचा आराखडा समजावून सांगितला आणि आज पुर्णत्वास आलेल्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या उंच टेकडीवर बुद्धाची भव्य दगडी मूर्ती बसविण्यात येणार आहे असे सांगितले.सदरची टेकडी बरीच उंच आहे.उंच टोकावर पोहचण्यासाठी ‘ रोप वे ‘चे बांधकाम करण्याचा मानस डाॕ.अशोक बोधी यांनी व्यक्त केला.

    ध्यान केंद्राच्या भव्य इमारतीशिवाय शिबीरार्थीसाठी निवास,भिक्षुसाठी निवास ,वाचनालय आदि इमारतीचे बांधकाम झाले असून आंतरव्यवस्थेचे काम प्रगती पथावर आहे.इमारती अगदी देखण्या असून उपयुक्तता देखील पर्याप्त साधली आहे.प्रवेशद्वार आकर्षक आणि बोलके आहे.प्रवेशद्वारावरूनच झांन केंद्राची भव्यता लक्षात येते.प्रवेशद्वारात जाताच प्रथम दृष्टीस पडते ती बुद्धाची सूंदर मूर्ती आणि अशोक स्तंभ ! अशोक स्तंभाचे काम अपूर्ण आहे.इमारतीच्या समोरच्या जागेत गार्डन आहे.

    आणि बौद्ध धम्माचे प्रतीक असलेल्या कमळासाठी बांधलेल्या जलाशयात कमल पुष्प आणि पत्र तरंगतांना दृष्टीस पडतात.डाॕ.अशोक बोधी यांच्या प्रास्ताविकातून ते जन्माने नाही, तर बौद्धधम्म जाणून घेऊन बौद्ध झालेत असे जाणवले.त्यांचे ग्रंथालय पाहिले.निरीक्षणावरून डाॕ .अशोक बोधी यांनी सर्वच धर्माचा तौलनिक अभ्यास केला आहे हे ध्यानी आले.

    जगाला बुद्धाशिवाय पर्याय नाही . म्हणून बौद्ध शिकवणीचा प्रचार आणि प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे.झांन बौद्धभूमी निश्चितच बौद्ध धम्माच्या प्रचारचे कार्य प्रचंड गतीने करेल यांत शंका नाही.सुंदर आणि प्रेरणादायी अश्या झांन बौद्धभूमीस हरेकांनी भेटून ऊर्जा प्राप्त करून घ्यावी अशी असे आहवान ॲड .अप्पाराव मैंद यांनी केले आहे.