अहेरी व आलापल्लीत धान खरेदी केंद्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

30

🔸शेतकऱ्यांनी धान शासकीय गोदामात विक्री करण्याचे केले आवाहन

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

अहेरी(दि.2डिसेंबर):- आदिवासी विकास महामंडळ, उप-प्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी केंद्राचे उदघाटन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे या हंगामातील धान मळणीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून या हंगामाच्या धान खरेदी केंद्राचे बुधवार 2 डिसेंबर रोजी आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी व आलापल्लीत विधिवत धान खरेदी केंद्राचे शुभारंभ केले.

यावेळी आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी, शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट शासकीय गोदामात आणून धानाची विक्री करावी कारण धानाला योग्य भाव व दरासह बोनसही मिळते. याचा लाभ शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात घ्यावे असे आवाहन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी यावेळी केले.

धान खरेदी केंद्राच्या शुभारंभाच्या वेळी आदिवासी विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष क्रिष्किंद्रराव बाबा आत्राम, उपाध्यक्ष बाबुराव जक्कोजवार, विपणन सहाय्यक दामोदर जुगनाके, ग्रेडर अनंतकुमार आलाम, माजी सरपंच गंगाराम कोडापे, सचिव राजेंद्र गौरकार आदी तर आलापल्ली येथे भीमय्या साइनवार, अचूबाई सडमेक, ईश्वर वेलादी, माजी उपसरपंच मलय्या तोटावार, सचिव कोमले, लक्ष्मण येरावार, बाबुराव तोरेम, पुनशे, तलांडे, बशीर शेख, सुरेश कोरेत, बाबुराव जुनघरे, आदित्य जक्कोजवार, शुभम चिंतावार आदी उपस्थित होते.