शेतकरी संघटनेतर्फे दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा – प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर

36

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.2डिसेंबर):-शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी विविध राज्यातील शेतकरी बांधवांच्या मोर्चाला सुरुवात झाली शेतकरी बांधवांना केंद्र सरकारने दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे तसेच शेतकरी बांधवांना लाठी चार्ज करण्यात आला हे अतिशय दुर्दैवी आहे प्रधान मंत्री व यांचे सर्व सचिव यांचा मी रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर जाहीर निषेध करतो.

आपण शेतकरी बांधवांना दाखवलेले स्वप्न पूर्ण करायचे सोडून लोकशाही मार्गाने चालू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार तर रयत शेतकरी संघटना हजारो शेतकरी सोबत घेऊन महाराष्ट्रात एकही खाज दार महाराष्ट्रात तथा एकही केंद्रीय मंत्री फिरू देणार नाहीत प्रधान मंत्री साहेब पंधरा लाख रुपये व काला धान या नावाखाली आपण राज्यासह देशात आपण शेतकरी बळीराजाला फसवून आपली राजकीय पोळी भाजून घेतली हे लक्षात आले आहे.

शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के वाढ हे आपण अमलात आणणे गरजेचे होते हे सोडून आपण सत्तेचा वापर केवळ आंदोलन दडपण्यासाठी करणार असाल तर परत महाराष्ट्रात कुठेही शेतकरी मिळावा घेऊन दाखवा असे आव्हान थेट रयत शेतकरी संघटनेचे नेते प्रदेश सरचिटणीस सुनील नानासाहेब ठोसर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले पुढे बोलताना महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे राजकारण केले जाते कुठल्याही योजना सरकार प्रभावीपणे राबवत नाही आहे.

त्या योजना योजनेचे टार्गेट नेते व कार्यकर्ते यांनाच पुरात नाही गोरगरीब शेतकरी बांधवांना कुठली योजना सामान्य माणसाला मिळाली याचे उदाहरण दाखवा बक्षीस मिळवा रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्यालयाकडे पीककर्ज,पीकविमा,निराधारांच्या समस्या, आत्महत्या ग्रस्त असलेल्या कुटुंबाचे प्रश्न सगळ्या फेकू जाहिराती प्रसिद्ध आहेत सामान्य माणसाला जगणे अवघड झाले आहे आपण साधे राशन नीट वाटू न शकणारे केंद्र सरकार , काला धन, पंधरा लाख या सर्व फेकू गोष्टी मारत आता लोकशाही मार्गाने लढा सुरू असताना समोरासमोर बसून शेतकरी प्रश्नावर बोलायला केंद्र सरकारच्या वतीने हिम्मत नाही.

आप यशी ठरलेल्या केंद्र सरकारला खरंच बांगड्यांचा आहेर पाठवण्यात येईल असा इशाराही देण्यात आला सत्तेचा गैवापर करत शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य केंद्र सरकारच्या दडपशाहीला चोक उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटील यांनी सांगितले