पिंपळनेर येथे गाईने दिले चार वासरांना जन्म

37

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

नेर(दि.2डिसेंबर):-पिंपळनेर येथील गाइने दिले चार वासरांना जन्म आजपर्यंत गाईने दोन, तीन वासरांना जन्म दिल्याच्या घटना घडलेल्या पहिल्या ऐकल्या आहेत. मात्र, धुळ्यातल्या पिंपळनेरमध्ये अचानक आज चार वासरांना जन्म देण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.नेर पिंपळनेर येथील संजयनगरमधील रहिवासी सतीश आनंदा निकम (वय ४५) या गायी म्हशींच्या व्यापाऱ्याच्या जर्सी गाईने चार वासरांना जन्म दिला आहे.

विशेष ही चारही वासरे धडधाकट आहेत. गुजरात राज्यातील बलसाड येथील शेतकर्‍यां कडून ४३ हजार रुपये किमतीची गाय तीन दिवसापूर्वी विक्रीसाठी आणली होती. ती गाय पिंपळनेर येथे मार्केट कमिटीच्या आवारात विक्रीसाठी आणली होती. या जर्सी जातीच्या गाईने चार वासरांना नैसर्गिकरीत्या जन्म दिला. या गायीला व वासरांना पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.