दोंडाईचा भाजपातर्फे अमरीश भाईच्या विजयाचा जल्लोश

    32

    ✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

    दोंडाईचा(दि.3डिसेंबर):- दोंडाईचा शहर भाजपातर्फे विधानपरिषदेचे उमेदवार अमरीशभाई पटेल‌ विजयी झाल्यामुळे दोंडाईचात जल्लोश करण्यात आला याप्रसंगी शहराध्यक्ष प्रविण महाजन यांनी सांगितले की धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानपरिषेदेवर भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.अमरीशभाई पटेल यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली.

    अमरीशभाई यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आक्टोंबर २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता त्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर मार्च महिन्यात निवडणूक जाहिर होऊन संपूर्ण प्रक्रिया पार पडली होती परंतु कोरोनाच्या संकटकाळात देशभरात लाँक डाऊन करण्यात आले होते म्हणुन आठवड्याभरावर येऊन ठेपलेली निवडणूक प्रक्रिया स्थगीत करण्यात आली होती.

    ती प्रक्रिया महाराष्ट्रात नागपुर , अमरावती, औरंगाबाद व पुणे विधानपरिषदेच्या निवडणुकीसोबत दि.१ डिसेंबर रोजी पार पडली त्यात भारतीय जनता पक्षाचे अमरीशभाई पटेल यांच्यासह ५ उमेदवार मोठ्या मताधिक्याने पुढे आहेत या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपाचे उमेदवार यांचा पराभव करण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केले परंतु भाजपाचे निवडणूक प्रभारी आमदार जयकुमार रावल यांनी आघाडीचेच मते फोडुन आघाडीला जोरदार धक्का दिला व अमरीश पटेल यांना ३३४ मते तर आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना फक्त ९८ मते पडली यामुळे आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आलीत असे सांगितले.

    दोंडाईचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शहराध्यक्ष प्रविण महाजन यांनी पुष्पहार अर्पण केला तसेच नगरसेवक व पदाधिकारींनी फटाके फोडुन एकमेकांना पेढे भरवुन आनंद व्यक्त केला

    याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन , सरचिटणीस कृष्णा नगराळे ,जितेंद्र गिरासे,भरतरी ठाकुर , बांधकाम सभापती निखिल जाधव , शिक्षण सभापती राजेश जाधव ,नगरसेवक संजय तावडे , चिरजिंवी चौधरी , रविंद्र जाधव ,खलील बागवान , नरेंद्र कोळी ,रुपसिंग अण्णा गिरासे उपाध्यक्ष ईश्र्वर धनगर ,ईस्माईल पिंजारी,व्यापारी आघाडी प्रमुख राकेश अग्रवाल,युवा मोर्चा प्रमुख राजु बाबा धनगर ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य पंकज चौधरी ,योगेश ठाकुर ,सचिन काळकाटे ,पंकज बोरसे ,प्रमोद अग्रवाल , नरेंद्र बावीस्कर,मनोज निकम ,अनिकेत आव्हाड ,अर्जुन गिरासे ,सागर ठाकुर ,रत्नपाल गिरासे ,इम्रान पिंजारी ,प्रतिक गिरासे ,संजोग रामोळे ,महेश गिरासे ,मनोज थोरात , दिलीप सिंह गिरासे इ पदाधिकारी उपस्थित होते.