मानवाचे कल्याण करणारे – बाबासाहेब आंबेडकर

28

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक नाव नाही तर मानव कल्याणाची उर्जा व उपाय आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माने भारत देशाच्या नावाला गर्व आणि स्वाभीमान प्राप्त झालाच पण ज्या ज्या विदेशी ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले पाय ठेवले ती जमीन सुध्दा धन्य झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जागतिक स्तरावरील आजपर्यंत चे ऐतिहासिक नोंद असलेले प्रत्येक रिकॉर्ड म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव मर्यादित नसून जगातील लोकांना स्वतः च्या देशाचे कल्याण करायचे असेल तर आजही बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण पर्याय नाही याची जाणीव जागतिक स्तरावर झालेली आहे.

आधुनिक जगामध्ये विद्वानांच्या यादीमध्ये एक नंबर वर असलेले नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. भारतातील बुद्धीभ्रष्ट लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मर्यादित करून त्यांचे कार्य व विचार समाजापासून दुर ठेवले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मर्यादित करण्याचा प्रयत्न काही विघातक शक्ती कडून नेहमी होत आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख फक्त दलितांचे कैवारी, अस्पृश्यांचे जनक, घटनेचे शिल्पकार ऐवढीच करून देतात. आणि काही लोकांच्या डोक्यात मेंदुचा अभाव असल्याने भारत देशाची असलेली भारतीची घटना वा भारताचे संविधाना एका विशिष्ट समुहाची जातीची खाजगी मालमत्ता वाटते आहे.

म्हणून डॉक्टर बावबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुद्धा काही विषमता वादी लोकांना सहन होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरीत होऊन समाजामध्ये सामाजिक समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्य अबाधित रहण्यासाठी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रबोधनाचे काम करून देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचार पेरण्याचे काम तन मन धनाने करत आहेत. उलट पक्षी विषमतेची घाण डोक्यात ठेऊन विशिष्ट समुहाच्या हाती सर्व सत्ता येण्यासाठी व समस्त मानवाला गुलाम बनवण्यासाठी एक विघातक शक्ती काम करत आहे. ही विघातक शक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना थांबण्याचे काम करत आहे.

परंतु आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे प्रचारात मोठ्या प्रमाणात तयार झाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज घरा घरात पोहचत आहेत आणि भारतीय लोकांना त्यांची जाणीव होत आहे. आज जातीची बंधने तोडून अनेक लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन विचार समाजात पेरण्याचे काम करत आहेत. हिच विचाराची ताकद आहे. डोक्यात मेंदु असला आणि तो सक्रिय असला तर मानसिक गुलामी सहसा स्विकारत नाहीत. जे मानसिक गुलाम नाहीत ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार आहेत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच मानवांचे कल्याण का कसे करू शकतात याची जाणीव आज लोकांना होत आहे. ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे प्रतिनिधित्व करणारे वा उद्धार करणारे होते असे म्हणतात ते मेंदूचा वापर करत नाहीत पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या मेहनतीचे खातात हे तेवढेच खरे आहे असे मी मानतो. भारतात जात धर्म पंथ वंश यावरून एवढी विषमता होती की भारतीय नागरिकांना साडेसहा हजार जातीत विभागून एका जातीतून दुसऱ्या जातीत जाण्याची मुभाच नव्हती. खालच्या जातीतील कितीही विद्वान असलेला व्यक्त आपल्या विद्वतेच्या जोरावर काहीच मिळवू शकत नव्हता याउलट वरच्या वर्णातील कितीही बुद्धीहीन असला तरी लायक समजले जायचे अशी विषमतावादी व मानसाला प्रगती पासून रोकणारी व्यवस्था येथे प्रस्थापित होती.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून मानवी गुलामांना उर्जा मिळाली गुलामाचे जिवन जगताना आपण माणूस आहोत आणि आपण सुद्धां वरच्या वर्णातील लोकांप्रमाणे जिवन जगु शकतो, प्रवाहामध्ये येऊन माणुस बनु शकतो ही उर्जा माणसाच्या मस्तकात भरण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आणि समस्त मानव जातीला ना धर्माचे आणि ना जातीचे तर देशाचे नागरिक बनवले. आणि मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय अशा प्रकारची शिकवण देऊन प्रवाहात आलेल्या लोकांची प्रगती झाली तर जाती धर्माचा गर्व न येता देशाचा स्वाभिमान निर्माण होण्यासाठी, भावी पिढीने देशहीताचे काम करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात सामाजिक समता प्रस्थापित करून मानवाला मानवाची ओळख करून दिली.

मानव हा जातीय विषमता व मानसिक गुलामगिरी मध्ये होताच पण स्त्री या ह्या जातीय आणि माणसिक गुलामगिरी सोबतच माणसाच्या गुलामगिरी मध्ये होत्या महिलांची दुहेरी गुलामगिरी तोडून महिलांना स्वतः चे अस्तित्व निर्माण करून देऊन माणसासमोर उभे राहण्याचा अधिकार नसलेली महीला आज मानसाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करते, शिक्षण घेते, नोकरी करते एवढेच काय स्त्रियांना संपत्ती पाहून दुर ठेवलेले असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे महिला माणसा एवढाच पगार घेऊन स्वतः चे अस्तित्व सिद्ध करतात हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच. अनिष्ट धार्मिक रूढी परंपरा याद्वारे महीलांना अंधविश्वासात एवढे गुरफटून टाकले होते कि काही काही महिलांना आजही गुलामीची लहर येते आणी महिला गुलामीचे जिवन जगण्यात धन्यता मानतात.

स्त्रियांना पवित्र मंदिरात, मशीदीमध्ये जाण्याची परवानगी नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत जाऊन सत्ता काबीज करण्याची ताकद महिलांना दिली. मासिक पाळीच्या वेळी महिलांना घरातील भांड्याला स्पर्श करण्याचा अधिकार नसताना महिलांना मासिक पगाराला स्पर्श करण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब यांनी दिला. पशुतूल्य महिलांच्या जिवनात मानुसकीचे रंग भर महिलांना अधिकार प्रदान करून मानसासमान सक्षम केले.शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुप संवेदनशील होते. शेतीला व्यावसायिक स्वरूप देऊन शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी आग्रही होते. शेतीच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या बाजु मांडून शेतीचा व्यवसाय कसा करायचा यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भर दिला. नद्या जोड प्रकल्पातून जलक्रांतीची जाणीव देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेव सच्चे भारतीय होत. देशातील शेतकऱ्यांना चोवीस तास पाणी, चोवीस तास सर्वात स्वस्त विज आणि पाण्यावर पर्यटन स्थळ निर्माण करण्याची संकल्पना मांडुन देशाला प्रगती पथावर जाण्याचा मार्ग दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव होत.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळून विद्यार्थांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून तर्कशुद्ध अभ्यास क्रम , नियोजन पुर्ण परिक्षा आणि अभ्यासपूर्ण शिक्षणावर भर देऊन शिक्षणाची गुणवत्ता कायम रहावी म्हणून विद्यार्थ्यांकडे विषेश लक्ष देणारे जागतिक विद्वान होत. भारतीय जनतेला मताचा अधिकार मिळावा म्हणून गोलमेज परिषदेमध्ये जाऊन मत देण्याचा अधिकार मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव आहेत. समाजाची बाजु उचलून धरण्याची नैतिक जबाबदारी हि प्रसारमाध्यमांची असते. परंतु आजचे प्रसार माध्यमे बघितले तर कोणाच्या ना कोणाच्या दावणीला बांधलेले दिसत आहेत. परंतु पत्रकारिता क्षेत्रात आपण कशाप्रकारे काम करावे, संपादक कसा असावा, पत्रकारिता कशी असावी यांचे सर्वात उर्जेदार उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत..

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वकिल सुद्धा होते समाजातील घटकांना न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अग्रेसर होते. समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विनाअट खटले लढवले आणि त्यांना न्याय दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी न्यायधिश लोक येऊन बसत यातून बाबासाहेब आंबेडकर यांची अभ्यास पुर्ण व सत्याच्या बाजुने असलेली वकीली सुद्धां समाजाला दिशादर्शक ठरते आहे. वरील गोष्टींचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मानवाच्या हिताचे होते विशिष्ट एका जाती धर्माच्या भल्यासाठी नव्हते. भारतीय नागरिकांना कोणतेही हक्क अधिकार नव्हते ते हक्क अधिकार घटनेच्या रुपाने भारतीय नागरिकांना प्रदान करून एक समतावादी व्यवस्था निर्माण करून दिली म्हणून माणवाचा विकास होण्यास मदत होत आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मर्यादित करून न मांडता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी व देशातील मानवाच्या अस्तित्वा साठी, देशाच्या नागरिकां साठी केलेले काम भारतीय नागरिकां पर्यंत पोहचवण्याचे काम केले तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पेरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली.

✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते(रा.आरेगाव,ता.मेहकर)मो:-९१३०९७९३००