ग्रामीण रूग्णालयासाठी मंजुरी मिळालेली जागा गैरसोयीची

25

🔹माजी नगराध्यक्ष डॉ.एस.एस.शेंगूलवार यांचे मत

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.3डिसेंबर):-तालुक्यातील कुंडलवाडी येथील ग्रामीण रूग्णालयासाठी पिंपळगाव(कुं)रोडवर असलेल्या जि.प.हायस्कूल ची इमारत असलेली जागा ही अयोग्य असुन जागेच्या परिसरात विविध धर्माच्या स्मशानभूमी असल्याने ही जागा गैरसोयीची असल्याचे मत काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष डॉ.एस.एस.शेंगूलवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
कुंडलवाडीत मंजूर झालेल्या ग्रामीण रूग्णालयासाठी पिंपळगाव(कुं)रोडवर असलेल्या येथील जि.प.हायस्कूल ची जुनी इमारतीची जागा मंजूर करण्यात आली.यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे.

नियोजित ठिकाणी बांधकामाचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराने काही महिन्यांपूर्वी कामास सुरूवात केली होती.पण याप्रकरणी तक्रारी करण्यात आल्याने सदरील काम गुत्तेदाराने बंद केल्याची माहिती मिळाली आहे.काम बंद करण्यात आल्याने सध्या ग्रामीण रूग्णालय बांधकामाविषयी शहरात सर्वच स्तरात चर्चा होत आहे.
याबाबत काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष डॉ.एस.एस.शेंगूलवार यांनी आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेतली.यात ते म्हणाले की,पिंपळगाव(कुं)रोडवर असलेल्या जि.प.हायस्कूल ची जुनी इमारती भोवती स्मशानभूमी असल्याने ही जागा अयोग्य व गैरसोयीची आहे.

त्यामुळे नगरपरिषदेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.असे मत डॉ. शेंगूलवार यांनी मांडले आहे. तसेच यासाठीचा मंजूर निधी कुठेही जाणार नसुन ग्रामीण रूग्णालयासाठीच्या बांधकामासाठी आलेला आहे. त्यामुळे तो शासनाकडे परत गेला तरी तो निधी पुन्हा आपल्यालाच मिळणार असल्याचे सांगितले.तसेच जि.प.हायस्कूल च्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालय मंजुरी मिळण्यासाठी च्या प्रशासकीय मान्यतेत जागेचा सर्व्हे नंबर चुकीचा टाकला आहे. हे जे कोणी केले त्यांनी जाणीवपूर्वक करण्यात आल्याचेही माजी नगराध्यक्ष डॉ.एस.एस.शेंगूलवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.