मूव्हमेंट फाॅर पिस अ‍ॅन्ड जस्टीस संघटनेच्या परळी शहराध्यक्षपदी शेख मिनहाजोद्दीन तर उपाध्यक्षपदी सय्यद अब्बास यांची निवड

32

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.3डिसेंबर):- प्रत्येक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी व सामाजिक कार्य करणारी तसेच राज्यभर चालणारी संघटना मूव्हमेंट फाॅर पिस अ‍ॅन्ड जस्टीस संघटनेच्या परळी शहर कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली.मूव्हमेंट फाॅर पिस अ‍ॅन्ड जस्टीस संघटनेच्या शहराध्यक्षपदी शेख मिनहाजोद्दीन तर उपाध्यक्ष पदी सय्यद अब्बास व सचिवपदी अब्दुल हाफेज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

संघटनेची बैठक येथील जमाते-ए-इस्लामी हिंदच्या कार्यालयात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद सबाहत यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली. बैठकीत संघटनेच्या ध्येय धोरणांविषयी मीहीती देण्यात आली.तसेच सामान्य नागरिकांना येणाऱ्या दैनंदिन समस्या, अडचणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासन व प्रशासन यांना अवगत करून द्यावे. प्रत्येक नागरिकांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक विकासासाठी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सय्यद सबाहत यांनी केले.

यावेळी सय्यद उमेर, मुदस्सर शेख, आदिल खान, शेख अरबाज, अरबाज खान, शेख फिरोज, सय्यद मुजम्मिल, शेख निजाम, जावेद शेख, अबुजर कुरेशी, आफरीज सय्यद, फरहातोद्दिन शेख यांची उपस्थिती होती.