मोफत पोलीस भरती व मार्गदर्शन शिबीर

32

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.3डिसेंबर):-माजी आमदार सुभाषजी साबणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देगलूर येथे धनाजी जोशी यांच्या वतीने मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.

देगलूरचे समाजसेवक तथा विध्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख धनाजी जोशी यांच्या वतीने मोफत पोलीस भरती व मार्गदर्शन शिबीर दि. 09-12-2020 ते 13-12-2020 आयोजित करण्यात आले आहे.पुण्यातील नामांकित अकॅडमीचे शिक्षक देगलूर शहरातील वर्दी करिअर अकॅडमीचे संचालक श्री एम एस मंगरूळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची सुरवात दररोज सकाळी 6 ते 7:30 या वेळेत देगलूर महाविद्यालयात ग्राऊंड प्रॅक्टीस असेल आणि 8 ते 9 या वेळात लेखी परिक्षेबद्दल मार्गदर्शन आयोजित केले आहे.

गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक धनाजी जोशी (विध्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख देगलूर) यांनी केले आहे.