चव्हाणवाडी येथे कोरडे आभाळ या पुस्तकाचे ॲड.प्रितमजी देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन

46

✒️महादेव उप्पे(देलगुर प्रतिनिधी)मो:-९४०४६४२४१७

चव्हाणवाडी(दि.3डिसेंबर):-येथे कोरडे आभाळ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद मानसिंग राठोड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कॉग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष मा.ॲड.प्रितमजी बाळासाहेब देशमुख हे होते.यावेळी राजेशा जाधव प्रास्तविक भाषणात अनिता लक्ष्मण जाधव लिखित शाळाबाह्य मुले ,सृजन सकाळ ,कोरडे आभाळ,हे ग्रामीण कथा संग्रह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या कविरत मेहनत काबाडकष्ट करून खरोखरच त्या आभाळाकडे पाहत बसावे लागतेकधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ हेच शेतकऱ्यांच्य वाटेला येत आहे.

हिच व्यथा कोरडे आभाळ या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिका अनिता लक्ष्मण जाधव यांनी समाजा समोर फार भावनात्मक पद्धतीने मांडला आहे.लेखिका अनिता लक्ष्मण जाधव यांनी लिहिलेल्या ६२ कवितांमध्ये पदर,वाड्यातल्या सुना,माझा बाप,गोदावरी माय,शोध कशा कवितेच्या माध्यमातून लेखिका शेतकऱ्यांच्या अन्यांयाला वाचा फोडण्याचे काम केले. तर यापुढे प्रकाशित होणारे इसाड या पुस्तकाचे लिखाण चालू असून त्यांनी संग्रहात ग्रामीण शेतकऱ्यांचे दुःख तसेच ओलावा आटलेल्या समाजाचेही चित्रन या कवितेत केले आहे.

लेखिका अनिता लक्ष्मण जाधव यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला असून अशा गरीबीच्या हालाखीतुन सुद्धा शिक्षणाला आपलंस केले व एम ए बि एड हि पदवी मिळवून ते अध्ययनाचे कार्य करीत आहेत यावेळी या कार्यक्रमात देविदास पाटिल,सचिन स्वामी,नथूराम राठोड ,करन राठोड ,दयानंद राठोड पत्रकार किशोर आडेकर,महादेव उप्पे आदि उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुणे त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेश जाधव यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दयानंद राठोड यांनी केले.या कार्यक्रमास गावातील नागरिक उपस्थित होते.