लोकस्वराज्य आंदोलनाच्या चंद्रपुर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष पदी बालाजी शिवाजी शिवमोरे यांची नियुक्ती

28

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.3डिसेंबर):- शेणगाव ता. जिवती येथे Sc आरक्षण वर्गीकरणा संदर्भात दहा लाख स्वाक्षरी मोहिमेविषयी बैठक पार पडली. या ठिकाणी सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन लोकस्वराज्य आंदोलनाचे महाराष्ट्र युवा आघाडी चे अध्यक्ष ॲड . दत्तराज गायकवाड उपस्थीत होते.

Sc मध्ये 59 जाती आहेत आणि आरक्षण मात्र 13% आहे. या पुर्ण जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही आहे. त्यामुळे अनेक जातीची सर्वांगीन प्रगती झाली नाहि. जो पर्यंत संपुर्ण Sc मधील 59 जातींची प्रगती होत नाहि तोपर्यंत आपण समाजाच्या योग्य प्रवाहात येणार नाहि. प्रवाहात येण्यासाठी प्रत्येक जातींना या मिळणाऱ्या 13% आरक्षणात वाटा मिळालाच पाहिजे आणि यासाठी आरक्षण अ , ब , क , ड , वर्गीकरण झालच पाहिजे. यासाठी आपल्या समाजाची शासन दरबारी दखल घ्यावी. म्हणुन लोकसंख्या जास्त असुन सुध्दा आपण ते सिध्द करु शकणार नाहि.

आपल्याला सिध्द करण्यासाठी आपली लोकसंख्या शासनाला दाखवायची आहे , या साठी प्रा.रामचंद्र भरांडे साहेबांनी महाराष्ट्रातील अनेक संघटना एकत्र आणल्या आणि आरक्षण वर्गीकरण कृती समिती गठीत करुन दहा लाख स्वाक्षरी मोहिम राबण्यात येत आहे. या दहा लाख स्वाक्षऱ्यांच ओझं जेव्हा शासनाला दिसेल तेव्हा आपला आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. या साठी दहा लाख स्वाक्षरी मोहिम महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे. अस ॲड. गायकवाड सभेला संबोधित केले.

याच सभेत चळवळीचे संस्थापक/ अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. दत्तराज गायकवाड यांनी बालाजी शिवमोरे यांना चळवळीत चंद्रपुर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष पदी नियुक्ती केली. सभेला ॲड. सचिन मेकाले , दिपक कांबळे , भानुदास गोटमुकले , केशव गवाले , सदाशिव कांबळे , सोपान गायकवाड , माधव वाघमारे , दत्ता घोडके , ज्ञानेश्वर बेले , चंदर यानकुडके इत्यादी कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थीत होते.