म्हसवडकर सेवा संघाचे वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन

34

✒️सचिन सरतापे(म्हसवड-माण,प्रतिनिधी)मो:-९०७५६८६१००

मुंबई(दि.4डिसेंबर):- स्थित म्हसवडकर रहिवासी यांनी शुक्रवार दि. 4/12/2020 रोजी सकाळी 11 वा. म्हसवडकर सेवा संघामध्ये आपल्या विभागातील लहान मुलांसाठी त्यांच्यातील कला गुणाच्या वाढीसाठी वाव मिळावा म्हणून प्रयोगात्मक चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. यास्पर्धेमध्ये ६ ते १४ वयोगटातील मुलांनी सहभाग घेतला त्यावेळी म्हसवडकर सेवा संघाचे अध्यक्ष – युवराज सरतापे, सचिव – मंगेश सरतापे आणि कृपा फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्तिथ होते.

यावेळी अध्यक्ष युवराज सरतापे म्हणाले लहान मुलांमध्ये कुठेना कुठे एक कलाकार लपलेला असतो त्याच्यातील कलाकाराला वाव मिळावा म्हणून म्हसवडकर सेवा संघाच्या वतीने विविध स्पर्धाचे आयोजन यापुढे होणार असून जास्तीत जास्त मुलांनी या स्पर्धामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले येणाऱ्या शुक्रवार दि. 11/12/2020 रोजी सकाळी 11 वा मुलांची वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार आहे. या सर्व स्पर्धाचे पारितोषिक वितरण हे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणार आहे.