संविधान एक्सप्रेस व दिक्षाभूमी एक्सप्रेस बंद केलेली बस पूर्वरत सुरु करण्यात यावी

37

🔸भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ तर्फे निवेदन

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)मो:-7875157855

यवतमाळ(दि.4डिसेंबर):- दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा यवतमाळ च्या वतीने संविधान एक्सप्रेस व दिक्षाभूमी एक्सप्रेस बस सुरु करणेबाबत निवेदन विभाग नियंत्रक राज्य परीवहन महामंडळ यवतमाळ विभाग यांना देण्यात आले.दारव्हा आगारातुन बस क्र. MH 14 BT 4679 ही बस संविधान एक्सप्रेस म्हणुन दारव्हा ते नागपुर तसेच दिग्रस आगारातुन बस क्र MH 40 AG 4439 ही बस दिक्षाभूमी एक्सप्रेस म्हणुन दिग्रस ते औरंगाबाद सुरु होती.

वरील दोन्ही बसेस आगारातील कर्मचारी यांनी आपले पैसे खर्च करुन रंगरंगोटी केली बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता.पृथ्वी असोसीएटच्या पत्राचा चुकीचा अर्थ काढुन आपल्या विभागाने वरील दोन्ही बसेस बंद केल्या सध्या एस .टी आगारातुन तुळजाई, अंबाबाई, अश्वमेघ, भिमाई, संत गजानन महाराज एक्सप्रेस, विठाई, शिवाई, कोकणकण्या, रायगड एक्सप्रेस, शिवनेरी या नावाने बस सुरु आहे.

असे असतांना केवळ संविधान एक्सप्रेस व दिक्षाभूमी एक्सप्रेस बंद करणे चुकीचे व अन्यायकारक आहे.संविधानाचे महत्व तर आपण जाणताच त्यामुळे वरील दोन्ही बस संबंधित आगारातुन पुन्हा सुरु करण्यात याव्यात अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष रविजी भगत, सरचिटणीस रुपेश वानखडे, दारव्हा तालुकाध्यक्ष प्रा. सिध्दार्थ गायकवाड, यवतमाळ तालुकाध्यक्ष मोहन भवरे, उपाध्यक्ष सिध्दार्थ बन्सोड, सचिव उत्तमराव कांबळे उपस्थिति होते.