चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

28

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

चंद्रपूर(दि.4डिसेंबर):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर २०२० ला जिल्ह्यात १५ ही तालुक्यात श्री.शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आद पवारसाहेब मुंबईहून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते व आद. पवारसाहेबांचे चाहते सामान्य नागरिक यांचेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (वर्चुअल रॅली) माध्यमातून थेट संवाद कार्यक्रम आयोजित करण्याच्या नियोजन करण्याच्या दृष्टीनेे दु १२ वाजेपासून ४ वाजेपर्यंत जिल्हाध्यक्ष श्री .राजेंद्रभाऊ वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत आद. शरद पवार साहेबांच्या 80 व्या वाढदिवस कार्यक्रमाचे नियोजन, सावली ,जिवती,पोंभूर्णा, गोंडपिपरी या नगरपंचायत,तसेच चिमूर नगर पालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली,”गाव तिथे राष्ट्रवादी” या अभियानाचा आढावा तसेच शहरांच्या वॉर्डवाईज बूथ बांधणी नियोजन करण्यात आले.

या बैठकीला जेष्ठ नेते हिराचंदजी बोरकुटे, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, जेष्ठ नेते महादेवराव पिदूरकर, ओबीसी सेलचे डी के आरिकर, भद्रावती निरीक्षक दीपकभाऊ जयस्वाल, राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुणभाऊ निमजे,सामजिक न्यायचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर, श्री अबिद अली, कोरपना निरीक्षक श्री.जयंत टेमुर्डे, प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख,ओबीसी जिल्हाध्यक्ष पंकज पवार,व ओबीसी शहर अध्यक्ष श्री माणिक लोणकर, सामजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, देव कन्नlके,पोंभूर्णा निरीक्षक डॉ.आनंद अडबाले, गोंडपिपरी निरीक्षक – श्री.शरद मानकर, बल्लारपूर निरीक्षक श्री.ऋषी हेपटे,जिवती निरीक्षक श्री.मेहमूद मुसा, राजुरा निरीक्षक श्री रफिक निजामी ,सौ.वंदना आवळे,सौ शोभा घरडे,सर्व तालुका अध्यक्ष, त्यात वरोरा श्री विशाल पारखी,भद्रावती – श्री सुधाकर रोहनकर,चंद्रपूर – श्री.विठ्ठल पिंपळकर,बल्लारपूर शहर अध्यक्ष – श्री.बादल उराडे,बल्लारपूर – देवतळे,पोंभूर्णा – श्री विजय ढोंगे,व श्री.हिराजी पावडे, मुल – श्री.गंगाधर कुनघाडकर व श्री.अशोक मार्गोनवार,राजुरा – श्री.संतोष देरकर,व श्री.आशिष यमनुरवार, कोरपना श्री.शरद जोगी,जिवती – श्री.कैलाश राठोड,गोंडपिपरी – श्री.राजेश कवठे,व श्री.नितेश मेश्राम,श्री.कुणाल गायकवाड, चिमूर – श्री.राजू मुरकुटे,नागभिड – डॉ.रघुनाथ बोरकर,सावली – श्री.प्रवीण उरकुडे,ब्रम्हपुरी – श्री.वासुदेव सौंदरकर,श्री.नोगेश बगमारे,श्री.मनोज कऱ्हाडे,श्री – संजय सिंग, माजी नगरसेवक श्री.राजेंद्र आखरे,श्री रमेश माखिजा,श्री प्रमोद देशमुख,श्री प्रकाश चेरकुरवार,श्री दिपक बुजाडे,श्री रक्षित माखिजा,श्री मनोज काच्छेला,श्रीनिवास घोसकुला,श्री दिलीप पिट्टलवार, श्री.विजेंद्र नन्नावरे,श्री.संजय पावडे, श्री.अशोक बोधे, श्री.भिमराव कंचकटले, श्री.शरद चव्हाण, महिला तालुका अध्यक्ष सौ दुर्गा विश्वास, सौ.अर्चना बुटले, सौ.अर्चना चावरे,नीता गेडाम पूजा उईके शहराध्यक्ष उपस्थित होते.