एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे येथे दिली भेट – प्रा. मोतीलाल सोनवणे

    45

    ✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

    धुळे(दि.5डिसेंबर):- दि.४/१२/२०२० खावटी अनुदान योजना २०२०-२१ अंतर्गत आदिवासी कोळी ढोर किंवा टोकरे कोळी, डोंगर कोळी किंवा कोळी महादेव, कोळी मल्हार, भिल्ल, ठाकूर अशा ४७ आदिवासी जमातींच्या सर्वे करण्यात आला आहे.प्रत्येक कुटुंबाला ४००० रुपये मिळणार आहेत. यासाठी आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे व आंदोलन प्रमुख नामदेव (आप्पासाहेब) येळवे यांनी शुक्रवार दिनांक ४/१२/२०२० रोजी आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे येथे भेट दिली.

    तेव्हा न्याहाळोद येथील २५० खावटीचे अर्ज व आरणी येथील ७७ खावटीचे अर्ज प्राप्त करून दिले.अपंग व विधवा महिला यांना खावटी योजनेचे फायदे व्हावेत अशी चर्चा करण्यात आली यावेळी मनीषा येळवे, पराग दावळे, अशोक दयाराम काकुळदे, अरुण सूर्यवंशी, पृथ्वीराज शिरसाठ, रुपेश जाधव, प्रकाश चव्हाण, हेमंत सोनवणे, रवींद्र चव्हाण, सदाशिव सूर्यवंशी, मोठाभाऊ ईशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.