महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन घरीच साजरा करुन अभिवादन करा – राजमाता जिजाऊ फाऊंङेशन व रमाई प्रतिष्ठान

38

✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.5डिसेंबर):-भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर अनुयायी यांनी चैत्यभूमी दादर मुंबईला न जाता आप आपल्या घरातच सुरक्षित राहून अभिवादन करावे.असे आवाहन राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण , रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवराज कोळे यांनी केले आहे.सध्या देशात कोरोना महामारीने थैमान घातले आसुन राज्यात कोरोना रोगाचा वाढता प्रभाव पाहून सर्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर अनुयायांनी शासनाच्या नियमाच्या अधिक राहून शासनाच्या निर्देशाचे पालन करावे

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व आंबेडकर आनुयायांनी चैत्यभूमी दादर येथे गर्दी न करता आप आपल्या गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व बौद्ध विहारात पाच पाच व्यक्तींनी जमा होऊन दीप प्रज्वलन बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करावे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आपल्या कुटुंबासमवेत आपल्या घरातच सामूहिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करावे असे आवाहन राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण , रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवराज कोळे यांनी केली आहे.