भारतीय बौध्द महासभा, बाभुळगाव तालुकाध्यक्षपदी सुरज भितकर यांची निवड

31

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)मो:-7875157855

बाभूळगाव(दि.6डिसेंबर):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेच्या वतीने स्थानिय विश्राम भवन बाभूळगाव येथे अध्यक्ष निवड सभेचे आयोजन करण्यात आले होते .या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रविजी भगत हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस रुपेश वानखडे ,संघटक विनोद वासे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुहिक त्रिशरण ,पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सभेमध्ये तालुकाध्यक्षपदी सुरज भितकर यांची निवड करण्यात आली .तसेच सरचिटणीस विलास मुनेश्वर ,कोषाध्यक्ष उमेश दातार, महिला उपाध्यक्ष प्रज्ञाताई ढोकणे यांची निवड करण्यात आली.

यावेळी मान्यवरांचे शुभेच्छापर मार्गदर्शन झाले. अध्यक्षीय भाषणात रविजी भगत म्हणाले की पदापेक्षा कार्याला महत्व देणे गरजेचे आहे . तेव्हाच भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकर्ता प्रत्येक घराघरात तयार होईल असा आशावाद व्यक्त केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मुनेश्वर यांनी केले तर आभार सुमेध कावळे यांनी मानले.

या कार्यक्रमाला पद्माकर कावळे, बंडू घरडे, स्वप्नील लांडगे, बेबीताई मोडक, मनोहर थुल, भास्कर तिरपुडे, सागर कोचपटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.