म्हसवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

33
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.6डिसेंबर):-येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आज 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करणेत आले यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस लहान मुलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले यावेळी सातारा जिल्हा भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा संघटक,बौद्धाचार्य आयु.कुमार सरतापे यांनी उपस्थित धम्म बांधवाना त्रिसरण पंचशील देऊन अभिवादन कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी आजचा दिवस धम्म बांधवांसाठी काय आहे हे लहान मुलांनी आपल्या छोटेखानी मनोगतातून सांगितले. धम्मसेवक आयु.चंद्रकात सरतापे यांनी आपल्या सुमधूर आवाजाने बाबासाहेबांच्या जीवनावर एक गीत गाऊन बाबासाहेबाना अभिवादन केले त्यावेळी सर्व उपस्थित धम्म बांधवांच्या डोळ्यात अश्रू आले.
यावेळी बोलताना बौद्धाचार्य कुमार सरतापे यांनी बाबासाहेबांचे जीवनाची महती सांगून त्याचे कार्य आपल्या बौद्ध आणि बहुजन समाजासाठी किती मोलाचे आहे हे सांगितले आज महापरिनिर्वाण दिनादिवशी आपण एकच मनाशी खूणगाठ बांधली पाहिजे जी बाबासाहेबानी चळवळीची जबाबादारी आपल्यावर दिली आहे.
त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून धम्म वाढविला पाहिजे तीच खरी बाबासाहेबाना आजच्या दिवशी श्रध्दांजली ठरेल यावेळी लहान मुलांची उपस्थिती मोठ्या प्रामाणावर होती.यानंतर सरणतेय गाथा घेऊन कार्यक्रम संपविण्यात आला.