अश्लील शिविगाळ करित जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस सहा महीण्याची शिक्षा

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.6डिसेंबर):-सहा डिसेंबर 2018 रोजी रात्री अंदाजे 8 वा,सुमारास आरोपी राजु किसन जोगदंडे,सनी चांदु जोगदंडे, सुखदेव किसन जोगदंडे यांनी फिर्यादी बळवंत मनवर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती.

फिर्यादी बळवंत मनवर (पत्रकार) यांनी पो,स्टे,शहर येथे आरोपी विरूध्द तक्रार दाखल केली होती,त्या तक्रारीच्या अनुषगांने पो,स्टे,पुसद शहरमध्ये अ,क्र,806/18 भादवी 294, 323, 504, 506, 34, नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर प्रकरणाची योग्य ति चौकशी करून पो,स्टे,पुसद शहर यांनी आरोपी विरूध्द न्यायालयामधे दोषारोप दाखल केले होते.

वि,न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायलय क्रंमाक 4 श्रीमानजी जि,बी,पवार साहेब यांनी संपुर्ण दोषारोप पत्रामधील फिर्यादी तथा आरोपी यांचे म्हणने ऐकून घेतले व त्या प्रकरणी वि,न्यायालयान भा,द,वी,चे विविध कलमा अंतर्गत आरोपीना सहा महीने सक्त मजुरी आणी प्रत्येकी 2000 हजार रूपये दंड ठोठावला आहे, वि,न्यायालयाने सक्त मजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे.

त्या दंडाच्या रक्कमे पैकी फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून झालेल्या दंडामधुन पाच हजार रूपये फीर्यादीस देण्यात यावे,असा आदेश करीत आपीलीच्या कालावधी नंतर आदेश आमलात आणावा असेही आदेशित केले आहे.फिर्यादीच्या वतीने शासणाची बाजु सह अभीयोक्ता श्री, टि, यु, चव्हाण यांनी मांडली, या प्रकरणी तपास अधिकारी पो,ना,2046 श्री, संभाजी केद्रे पो,स्टे पुसद शहर यांनी तपास कार्य पुर्ण केले होते.