तुटला आधार

33

सागरा किनारी । भीमजी निजले ।
सोडुनी चालले । सगळ्यांना ।।

सूर्यास्त जाहला । सर्वत्र अंधार ।
तुटला आधार । जनतेचा ।।

बाबासाहेबांनी । शेटवच्या क्षणी ।
केलेली पाहणी । पुस्तकांची ।।

निर्वाण क्षणीही । दिली शिकवण ।
पुस्तक वाचन । करा तुम्ही ।।

बाबसाहेबांना । मनात जागवा ।
कृतीने वाचवा । समाजास ।।

कृतीतून पुन्हा । भीमजी दिसावा ।
कोणीच नसावा । अत्याचारी ।।

संविधान वाचा । हक्क ज्ञात करा ।
भीमजींना स्मरा । नियमित ।।

जग जिंकूनिया । गेले भीमराव ।
सगळ्यांना ठाव । विश्वरत्न ।।

अभिवादनास । अभंग लिहतो ।
अजय करतो । गुणगान ।।

✒️कवी:-अजय रमेश चव्हाण,तरनोळी(ता.दारव्हा,जि.यवतमाळ)मो:-८८०५८३६२०७