कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या शांतता समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींना डावलले

25

🔸महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांचे शिष्टमंडळ आज पोलीस अधिक्षकांची भेट घेणार

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.6डिसेंबर):- येथील पोलीस ठाण्याच्या वतीने नुकतीत ६ डिसेंबर बाबरी मशीद विध्वसंक दिन व महापरिनिर्वाण दिना निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीस महाविकास आघाडीचे नगराध्यक्षा व सत्ताधारी नगरसेवक यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले असुन याप्रकरणी आज दि.६ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीचे नगराध्यक्षा व सत्ताधारी नगरसेवकांचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची भेट घेऊन कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार करणार असल्याची माहिती महाविकास आघाडीचे नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांनी दिली.

कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने दि.६ डिसेंबर बाबरी मशीद विध्वसंक दिन व महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नुकतीच एक बैठक घेण्यात आली.यात धार्मिक संघटना,सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.पण या बैठकीस शहरातील प्रथम नागरिक नगराध्यक्षा,नगरसेवक व पत्रकार यांना मात्र पोलीस ठाण्याच्या वतीने बोलाविण्यात आले नव्हते.समाजातील व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नगराध्यक्षा, नगरसेवक, पत्रकार हे महत्वाची भूमिका निभावतात.

असे असतानाही पोलीस ठाण्यातील अधिका-यांनी जाणीवपूर्वक लोकप्रतिनिधी, पत्रकारांना बैठकीस बोलाविण्यात आले नाही. याप्रकरणी आज दि.६ डिसेंबर रोजी नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांचे शिष्टमंडळ पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांची भेट घेऊन पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी यांच्या मनमानी कारभाराची तक्रार करून अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांनी ‘दै.सत्यप्रभा’शी बोलले.

कुंडलवाडी पोलीस ठाण्या अंतर्गत चालु असलेल्या अवैध धंद्यासंदर्भात पत्रकारांनी व लोकप्रतिनीधींनी प्रश्नांचा भडीमार करतील या धास्तीेने केवळ शांतता समितीच्या बैठकीस मर्जीतल्या व काही मोजक्या लोकांना बोलावुन बैठकीचे आयोजन केले असल्याचे नागरीकातुन चर्चा होताना दिसुन येते.मराठवाडा पदविधर निवडणुकीचे आचार संहीता असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना व पत्रकारांना या बैठकीस बोलावले नसल्याचे या संदर्भात प्रतिक्रिया सपोनी सुरेश मांटे यांनी दिली.