चामोर्शी तालुक्यातील महींद्र नारायण वर्धलवार यांना आचार्य पदवी

34

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

चामोर्शी(दि.6डिसेंबर):- तालुक्यातील मुधोली चक नं.१ येथिल महींद्र नारायण वर्धलवार यांना नुकतेच पिएचडी जाहिर झाली आहे.त्यांचा शैक्षणिक प्रवास Class- 1 मुधोली तुकुम ते PhD. Economics पुणे, अत्यंत संघर्षमय आहे.

लहानपणापासुण ग्रामिण भागात राहील्यामुळे आदिवासींच्या समस्या अत्यंत जवळुण पाहता आल्यामुळे त्यांनी आपल्या PhD. च्या संशोधनासाठी शासकिय योजनांचा आदिवासींच्या विकासावर काय परिणाम झाला ? त्यात काय अडथळे आहेत ? अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी आपले PhD चे संशोधण “A Study to Assess the Impact of Government Schemes and Programmes on the Development of Tribes in Gadchiroli District of Maharashtra” या विषयावर डाॅ.प्रशांत बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणेच्या जगप्रसिद्द अशा “Gokhale Institute of Politics and Economics” या संस्थेतुन पूर्ण झाले.

हे संशोधन अत्यंत मेहणत घेऊन अगदी वेळेत (४ वर्षे १० महीणे) पुर्ण केले. या संशोधनासाठी त्यांना दिल्लीच्या ICSSR या संस्थेकडुण दोन वर्षासाठी फेलोशीप मिळाली होती. यापुर्वी त्यांनी याच अर्थशास्त्र विषयात NET आणि SET परिक्षाही ऊत्तीर्ण झाले आहे. याच दरम्यान पुणेच्या प्रसिद्द अशा Furguson College मध्येही अध्यापणाचे कामही केले आहे.