डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शोषितांचा मुक्तिदाता – डॉ. राकेश तलमले

31

🔸गंगाबाई तलमले महाविद्यालय येथे 64 व्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.6डिसेंबर):-येथील स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या प्रतिमेस रयत बहुउद्देशीय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. राकेश तलमले यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य मंगेश देवढगले, जे. पी. कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक रोशन मदनकर, प्रा. हर्षा बगमारे, प्रा.कुमोद राऊत, प्रा.अनिल प्रधान, कनक ठोंबरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी विचार मांडताना रयत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राकेश तलमले म्हणाले की, वर्षानुवर्षाच्या गुलामीच्या जोखडातून मुक्त करणारा मुक्तिदाता म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी लिहिलेले संविधान सर्वांना न्याय देणारे आहे पण संविधानाची अंमलबजावणी करणारे कसे आहेत यावर त्याचे यश अवलंबून आहे. जे.पी. कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक रोशन मदनकर म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना प्रत्येक भारतीयांसाठी मिळालेली अमूल्य देणगी आहे.

माणसाला माणूस म्हणून जगण्यास मिळालेली गॅरंटी आहे. प्राचार्य मंगेश देवढगले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे अग्रदूत आहेत. त्यांचे विचार शाश्वत असून अखिल मानव जातीचे कल्याण करणारे आहेत. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कूमोद राऊत यांनी तर आभार कुलकिर्ती ठोंबरे यांनी मानले.