डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांच्या कार्यालयात पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन

30

✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.6डिसेंबर):-भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 साली दिल्लीमध्ये निधन झाले. त्यानंतर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून पाळला जातो.!भारतातील अस्पृश्यता, दलितांना मिळणारी दुय्यम वागणूक यामधून समाजातील मोठ्या घटकाला बाहेर काढून शिकण्याची, संघटीत होण्याची आणि संघर्ष करण्याची शिकवण देणारे म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या नायगांव येथील कार्यालयात दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बाबुराव घंटेवाड , बडूरकर साहेब,पुरूषोत्तम शिंदे, संग्राम बेलकर यांची उपस्थिती होती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस्र् व्यक्तिमत्त्व आजही आपणा सर्व भारतीयांना सदैव स्फूर्ती देणारे व दिशादर्शक तसेच प्रेरणादायी आहेत भारताच्या सर्वागीण विकासासाठी लोकशाहीप्रणीत भारतीय संविधान निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेवर कधीही न फिटणारे उपकार केले आहेत,असे मत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवर यांनी आमच्या न्युजशी बोलताना व्यक्त केले.