दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील के आर टी विद्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

30

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

दिंडोरी(दि.6डिसेंबर):-मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर काॅलेज मोहाडी विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी होते .अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश कळमकर ,विलास पाटील,नंदकुमार डिगोंरे, सुदाम पाटील, वसंत देशमुख,संतोष निकम, रंगनाथ घोलप, केशव जाधव आदी मान्यवर उपस्थित होतेकार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विजय म्हस्के यांनी केले .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.शिका ,संघटित व्हा व आपल्या न्यायहक्कासाठी संघर्ष करा असा बहुमोल मंत्र बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनीही बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानविषयी माहिती दिली.

भारतीय राज्यघटना बनविण्यात बाबासाहेबांनी मोलाचे योगदान दिले आहे .स्वांतत्र, समता,व बंधुता या बाबासाहेब यांनी सांगितलेल्या तत्वावर आपण चालले पाहिजे .तसेच बाबासाहेबांचा आदर्श आपण सर्वांनी आपल्या जीवनात घ्यावा असे सांगितले .कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदु पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन प्रदीप जाधव यांनी मानले