सकल वंजारी समाज संघटना समन्वय समितीच्या मुख्य समन्वयक पदी फुलचंदभाऊ कराड यांची सर्वांनुमते निवड

30

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.7डिसेंबर):-आज राज्यभरातील वंजारी समाजातील सर्व सामाजिक संघटना यांच्या प्रमुख पदाधिकारी यांची महत्वपूर्ण विषयावर बैठक संपन्न झाली.सध्या वंजारी समाजासमोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत उदा.आरक्षणाची कमतरता,बिंदु नामावली इ. या विषयासंबंधी सखोल चर्चा करण्यात आली. मुंबई येथिल समाजसेवक नामदेव सानप यांच्या प्रयत्नातून राज्यात प्रथमच समाजातील सर्व संघटना एका मंचावर आल्या होत्या. अतिशय ऐतिहासिक अशी बैठक संपन्न प्रथमच पार पडली.

या बैठकित सर्वानुमते भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंदराव कराड यांची निवड सकल वंजारी समाज संघटना समन्वय समितीच्या मुख्य समन्वयक पदी निवड जाहिर करण्यात आली.या बैठकिमध्ये आरक्षण,समांतर आरक्षण,न्यायालयीन लढा या विषयावर विचार व्यक्त केले. आरक्षण कि, वाढीव आरक्षण कि भटके विमुक्त प्रवर्ग एकत्रीकरण कसा असावा हा लढा? आरक्षणासंबंधी लढाई चालू करायची असेल तर ती कशी चालू करावी लागेल याबाबतीत १९६१ ते २०२० दरम्यानच्या विविध समित्या,आयोग यासंबधी सखोल चर्चा झाली. सध्या राज्य सरकार व केंद्र सरकारच्या पातळीवर काय चालू आहे याबाबतीतही चर्चा झाली.

लढा कसा लढावा लागेल? इतर मागण्या, पर्यायी लढा इ विषय त्यांनी विचार व्यक्त केले. जसे कि जमातीच्या योजना सर्व भटके विमुक्तांना लागू कराव्यात, केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाने सर्वेक्षण चालू करावे इत्यादी.याप्रसंगी नवनियुक्त मुख्य समन्वयक श्री.फुलचंद कराड यांनी आपले उर्वरित आयुष्य समाजाठी आज समर्पित करित असल्याची भावना व्यक्त केली. आज सर्वांना एकत्रित पाहुन खर्‍या अर्थाने मुंडे साहेबांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल तसेच माझ्या शेजारी साहेब बसले असल्याची जाणिव होत आहे अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी त्यांच्यासहित सर्वच पदाधिकारी गहिवरले होते.
समाजाच्या भल्यासाठी,योग्य विषयासाठी सर्वच पदाधिकारी मन-मत भेद बाजुला काम करतील अशी भुमिका व्यक्त केली. यावेळी मा.श्री.बाळासाहेब सानप यांनी समाजासाठी सदैव तत्पर असुन या लढ्यासाठी सर्वप्रकारचू योगदान देण्याची तयारी असल्याचे सांगितले. तसेच सर्व सामाजिक संघटना एका व्यासपिठावर आल्याचे समाधान व्यक्त केले.

श्री.व्यंकट भताने सर,प्राचार्य डाॅ.खुशाल मुंढे, धनराज गुट्टे,लक्ष्मण बुधवंत,राहुल जाधवर,मारुती उगलमुगले, गणेश खाडे,राजेंद्र करपे, श्री.बिक्कड,अमित साळवे, बाळासाहेब नागरे,डाॅ.मंजुषाताई दराडे,मनिषाताई मुंडे-वाघ, मंदाताई फड, स्वातीताई मोराळे, बंडु जायभाये यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

याबैठकिसाठी राज्याच्या सर्वच भागातून संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सर्वानीच अतिशय अनुभवी,मुंडे साहेबांचे सहकारी, भगवान सेना या सर्वात जुन्या संघटनेचे सरसेनापती मा.श्री.फुलचंद कराड यांचे मुख्य समन्वयक पदाची जबादारी स्विकारल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि अभिनंदन केले.सर्व ताकतीनिशी हा लढा आपण सर्वांच्या सोबतीने आणि समाजातील अभ्यासू व तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाने आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत,सर्व संघटना,संस्था व मंडळे यांच्यासोबत समन्वय साधुन या लढ्याला अंतिम स्वरुप देण्यात येणार असल्याचे व पुढील बैठक भगवानगड,सावरगांव घाट येथे जाऊन बाबांचे दर्शन घेऊन गोपिनाथगड येथे साहेबांच्या सानिध्यात घेणार असल्याचे जाहिर केले.याबैठकिचे नियोजन व व्यवस्था श्री.व्यंकट भताने सर यांच्या माध्यमातू ग्रामप्रबोधनी,साळुंब्रे येथे करण्यात आले होते.