गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यानी भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

22

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.7डिसेंबर):-दिल्लीच्या सीमांवर सध्या किसान आंदोलन चांxगलेच पेटलेले आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांच्या वतीने ऊद्या ( दि. ८ डिसेंबर ) रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली आहे. या अंतर्गत गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने आणलेली तीन विधेयके ही शेतकरी विरोधी असल्याची भावना शेतकऱ्यांची झालेली आहे. ही तिन्ही विधेयके रद्द करावीत या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन दिल्लीच्या सीमावर्ती भागात उभे ठाकले आहे. या भागात शेतकरी मोठ्या संख्येने जमलेले असून शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ऊद्या भारत बंद पुकारण्यात आला आहे. या संदर्भात आज गंगाखेड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ऊद्या सकाळी ११ वाजता शहरातील भगवती मंदिर येथून मोर्चा निघणार असून यात विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

या बंद मध्ये गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका संयोजक ओंकार पवार, कॉग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, प्रहार जनशक्तीचे सुरेश ईखे, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष माधव भोसले, युवक कॉंग्रेसचे सिद्धार्थ भालेराव, नागेश डमरे, व मित्र पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.