किनगावात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

31

✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

अहमदपूर(दि.7डिसेंबर):-अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे नालंदा बुद्ध विहार भीमनगर व तथागत बुद्ध विहार येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या हस्ते झाले नालंदा बुद्ध विहार भीमनगर येथे पोलिस कॉन्स्टेबल आयु महाके साहेब यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले, तथागत बुद्ध विहार येथे माजी ग्रामपंचायत सदस्य आयु रामजी बोडके यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी बौद्धाचार्य आयु सुनिल कांबळे यांनी त्रिशरण पंचशील पुजापाठ घेतले यावेळी अभिवादन करण्यासाठी आयु भारतीय बौद्ध महासभा शाखा किनगावचे अध्यक्ष आयु श्रीमंत कांबळे सर, रिपाइंचे सुनिल वाहुळे, ग्रामपंचायत सदस्य धम्मानंद कांबळे,माजी ग्रामपंचायत सदस्य देविदास वाहुळे, तालुका सचिव अंकुश वाहुळे,सल्लागार नरहरी गायकवाड,टि.टि.वाहुळे सर, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी वाहुळे, सोसायटी संचालक संतराम कांबळे, दशरथ कांबळे, बालाजी कांबळे चेअरमन, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शटिबा श्रृंगारे, अर्जुन कांबळे,सुरेश गायकवाड,बौद्धाचार्य विजय कांबळे, मिथुन गायकवाड,मंगेश कांबळे,प्रविन कांबळे, बालाजी गायकवाड, संजय वाहुळे,प्रित्तम कांबळे, हर्षवर्धन कांबळे,राजन आचार्य, गोकुळ कांबळे,अमोल कांबळे,प्रमोद कांबळे, गौतम कांबळे, सचिन वाहुळे,वंसत वाहुळे, बाबुराव वाहुळे, गोकुळ वाहुळे, रघुनाथ आचार्य, व महिला उपासिका जिल्हा सचिव भारतीय बौद्ध महासभा आयुषमाननी करुणा धम्मानंद कांबळे,सुषमा श्रीमंत कांबळे,इंदुमती सुनिल कांबळे,संघप्रिया विशाल चोपडे,दिक्षा हर्षवर्धन कांबळे यांनी अभिवादन केले…