ब्रह्मपुरी ची दिव्यांग कन्या प्रीती सोढा यांचा प्रेरणादायी उपक्रम

31

🔹हिंगोली येथे सामाजिक कार्याबद्दल गौरवन्वित

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपूरी(दि.8डिसेंबर):- शारीरिक दृष्ट्या सक्षम असणारा माणूस जर मानसिक दृष्ट्या सक्षम नसेल तर जीवनात काही करू शकत नाही परंतु शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त नसतानासुद्धा मानसिक दृष्ट्या सक्षम असेल आपल्या शारिरीक दुर्बलतेवर निश्चित मात करू शकते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वाशीम येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कनेरगाव येथे कार्यरत असणाऱ्या व ब्रह्मपुरी ची कन्या असलेल्या दिव्यांग शिक्षिका प्रीती सोढा होय.
ब्रह्मपुरी येथे प्रीती सोढा त्यांचा जन्म दहाव्या महिन्यात पोलिओमुळे त्यांना अपंगत्व आले.

असे असतानासुद्धा खडतर हलाखीच्या परिस्थितीत शारीरिक दुर्बलतेवर मात करीत पदवी ,पदव्युत्तर पदवी, डी एड, बी एड, ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रम, टंकलेखन 50 गती पर्यंत शिक्षण घेऊन 2003 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका याठिकाणी शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. लहानपणापासूनच संघर्ष व मात करीत जगण्याची व उपजत नैसर्गिक बुद्धिमत्ता असल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी वर्ग , इंग्रजी शाळेच्या तोडीचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संस्कृती कार्यक्रम घेणे यासारखे उच्च वर्गाचे शिक्षण देत आहेत.
या शैक्षणिक कार्यासोबतच त्यांचे सामाजिक कार्य सुद्धा वाखाणण्याजोगे आहे या कार्याची दखल घेत प्रीती सोढा यांना साथ फाउंडेशन हिंगोली च्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सन 2020-20 दिव्यांग प्रेरणा पुरस्काराने मीरा कदम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कोरोना संकट काळात सातत्याने पुढाकार घेऊन ज्ञानदानाचे शैक्षणिक कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हिंगोली च्या वतीने शिक्षक दिनाच्या दिवशी उपक्रमशील शिक्षिका गौरवण्यात आले. अपंग असून सुद्धा जिद्द व चिकाटी आणि हिंमत असेल तर जीवनात कोणती गोष्ट शक्य आहे. त्यांच्या कृती आणि कर्तुत्वातुन दिसून येते. स्वतः चीच संकटे मोठी आहेत. कसे वाटणाऱ्या समाजातील लोकांसाठी दिव्यांग शिक्षिका प्रीती सोढा या आदर्श ठरले आहेत.