शेतकऱ्यांच्या समर्थानात ब्रम्हपूरी तालुका बंद

33

🔸ब्रह्मपुरी तालुका युवा विदर्भ आघाडी चा भारत बंद ला पाठिंबा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपूरी(दि.8डिसेंबर):-केंद्र शासनाने शेती व शेतक-यांच्या संदर्भात तीन काळे कायदे पारित केले आहेत. मात्र यात शेतकऱ्यांचे मत विचारात घेतले गेले नाही या कायद्यांना विरोधकरण्यासाठी विविध संघटनानी मंगळवार दि. ८ डिसेंबर २०२० रोजी भारत बंदचे आवाहन केलेले आहे.

त्यास ब्रम्हपूरी युवा विदर्भ आघाडी ने सुद्धा या भारत बंदला पाठिंबा दिला असून   आज ८ डिसेंबर मंगळवारला शांतता पूर्ण बंद चे आव्हान करण्यात आले आहे .

मोदी सरकारने शेतकरी विरोधात काळे कायदे पारित केले त्या कायद्या विरोधात पंजाब व हरियाणा येथील मोठ्या प्रमाणात शेतकरी  गारठणाऱ्या थंडीतही दिल्ली च्या सीमेवर उपस्तीत आहेत. मात्र त्यांना दिल्लीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर अश्रूधुर, पाण्याचा मारा केला जात आहे. त्यांना खालीस्थानी म्हणून संबोधले जात आहे. परंतु त्यांची व्यथा जाणण्यासाठी कोणी तयार नाहीत.

म्हणून शेतकरी नेत्यांनी ८ डिसेंबरला संपूर्ण भारत बंद ची हाक दिलेली आहे. त्या बंद ला अनेक बाळासाहेब थोरात आणि संघटना व राजकीय पक्षां यांनी पाठिंबा दिला असल्याने ब्रम्हपूरी युवा विदर्भ आघाडी ने सुध्दा भारत बंद ठेवण्याचा निर्णयाला पाठिंबा देण्यात आला आहे. करीता युवा विदर्भ आघाडी ब्रम्हपूरी चे कार्यकर्ते यांनी  सदर भारत बंद हे शांतता पूर्ण व यशस्वी करण्याचे आव्हान करीत आहे.