चिमूर येथे वीज बिलाची होळी

27

🔸विदर्भ राज्य आंदोलन समिती व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतिने निवेदन सादर

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.8डिसेंबर):-वेगळे विदर्भ राज्य व शेतकरी आंदोलन ,लॉक डॉऊन काळात वाढीव विज बिल यांच्या संदर्भात चिमूर मंध्ये एक दिवसाचे विदर्भ राज्य आंदोलन समिती व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतिने आंदोलन करून तहसिलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी वाढीव विज बिलाची होळी करण्यात आली.

या प्रसंगी डॉ . रमेश कूमार गजभे ( माजी राज्य मंत्री व संयोजक विदर्भ राज्य समिती) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन संपन्न झाले. या प्रसंगी अरविंद सांदेकर , शालीक थुल , गजानन अगडे , सांरग दाभेकर , संजय वाकडे , मनोज राऊत , विनोद सोरदे , जनार्धन खोब्रागडे , बाबूराव दिघोरे, राजू बोरकर विश्वास गजभे व इतर कार्यकर्ता गण उपस्थित होते.