दिव्यांग व्यंगवर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी मोकाट

105

🔺गाडगे नगर अमरावती पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यप्रणालीवर संशय (?)

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.8डिसेंबर):-येथिल कायम रहिवाशी असलेले आर्यन ऑप्टीकल चे संचालक व अपंग पती, पत्नी संदिप जयस्वाल यांना अपंग व्यंगावर शिवीगाळ करुन मारहान करणारे व जिवे मारण्याची धमकी देणारे उदम मोटवणी,लालचंद मोटवणी, साहिल मोटवणी,दीपक मोटवाणी यांच्यावर दि . 20 नोव्हेंबर रोजी 392 , 324 , 294 , 506 , ( ब ) 427 , 34 भा.द.वी 92 ( ब ) ( इ ), अपंग हक्क अधिनियम 2016 च्या कायद्यानुसार गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते , परंतु अजुन पर्यंत लालचंद मोटवाणी यांना पोलीसांनी अटक केली नाही. लालचंद मोटवाणी हे शहरात खुलेआम फिरत आहे.

व फिर्यादी अपंगाला वेगवेगळया प्रकारे जीवे मारण्याच्या धमक्या देत असून लालचंद मोटवाणी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यामुळे नागपूर येथील अंबाझरी पोलीस स्टेशन येथे लाला मोटवानी यांच्यावर खंडनी व फ्लॅट बळजबरीने हिसकावने अशा तक्रारी दि . 11/09/2020 रोजी 384 , 452 , 323,504 , 506 , 34 व अशा अनेक तक्रारी नागपूर जिल्हयात लालचंद मोटवानी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून लालचंद मोटवाणी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी.

जर त्यांना 24 तासा मध्ये अटक न झाल्यास दि.9/12/20 रोजी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याबाबतचे निवेदन अपंग जनता दल सघंटनेच्या वतीने देण्यात आले.निवेदन देताना सस्थापक अध्यक्ष अनिस शेख (पत्रकार) मयुर मेश्राम, येनस येथिल प्रदिप रघुते,किशोर मानेकर,राजिक शहा,संदिप जयस्वार.रामेश्वर राठोड इतर अपंग सुद्धा हजर होते.