घनसावंगी येथे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा

38

🔸आरक्षण अबाधित ठेवण्यासह जातीनिहाय जनगणनेची केली मागणी

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.8डिसेंबर):-ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण अबाधित राहावे, तसेच ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका घनसावंगी येथील तहसील कार्यालयावर सोमवार दिनांक – ०७ रोजी भव्य आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने मंजुषा कोरडे व अन्य मुलींच्या हस्ते नायब तहसीलदार गौरव खैरनार यांना निवेदन देण्यात आले.

ओबीसी समाजाच्या वतीने शहरातील एमएसईबी कार्यालय ते बँक ऑफ महाराष्ट्र मार्गे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चात सहभागी असलेले हजारो महीला व नागरिकांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेत घोषणा दिल्या. यावेळी ओबीसी समाजाला मिळालेले 27 टक्के आरक्षण आबाधित राहावे तसेच ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, महाज्योती संस्थेला सारथी प्रमाणे तात्काळ निधी देण्यात यावा. आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चानंतर प्रा. चुनीलाल जाधव, प्रा. भगवानसींग डोभाळ यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन तुळशीरामजी कोरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.शाम भोसले यांनी मानले.

यावेळी प्रा.सत्संग मुंडे, डॉ. प्रकाश इंगळे, संतोष जमधडे, विशाल धानुरे, सुंदरराव कुदळे, यांची पाहुणे म्हणून उपस्थिती होती, व तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ (आबा) वाघमारे, भास्कर बापु गाढवे, मानिकराव राऊत, विष्णुपंत जाधव, बद्रीनाथ गाढवे, संतोष शिंदे, आकाश गायकवाड, संजय रणमळे,डॉ.भीमराव खडेकर, डॉ.रमेश तारगे, ह.भ.प. तुकाराम महाराज राठोड, रमेश महाराज वाघ, भास्कर वराडे, विक्रम वराडे,गजानन वायसे, रामेश्वर काळे, जनार्दन बारवकर, ॲड.कैलाश जारे, विठ्ठलराव खैरे, गणेश राठोड, रमेश पवार,सुरेशराव गाडेकर, सुरेश पोटे, बाळासाहेब बोरकर, अंकुशमामा पवार,ओमजी जाधव, संजय धोत्रे, बालाजी गाढवे, परमेश्वर सोमवारे, अंकुशराव रोकडे, पांडुरंग साळवे, परमेश्वर खरात, नानासाहेब महानोर, राधाकृष्ण भालेकर यांच्यासह हजारो ओबीसी बांधव माता भगीणी उपस्थित होत्या.