शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ हणेगाव येथे बंदला उत्सफूर्त प्रतिसाद

59

✒️महादेव उप्पे(देलगुर प्रतिनिधी)मो:-९४०४६४२४१७

देलगुर(दि.8डिसेंबर):-आज सरकार विरोधात पूकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला समर्थन करत हणेगाव येथे दि.०८/१२/२०२० रोज मंगळवारी शेतकरी ,व्यापारी व क्रषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व आडत दुकाने बंद ठेऊन या भारत बंदला आपले समर्थन दिले.यावेळी हणेगाव येथील बसस्थानक परिसरात शूकशूकाट दिसत होते.

यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आले.यावेळी मरखेल पोलिस स्टेशनचे सहा.पो.निरीक्षक अदित्य लोणीकर,पो.उपनिरीक्षक अजित बिरादार,हणेगावचे बीट जमादार कनकवले साहेब ,शब्बीर शेख,जोगपेठे जी.एच.पांढरे बी.बी.केंद्रे जी.बी.इंगोले पाटिल,अवधूते एस,के,आदिनी बंदोबस्त ठेवला होता.