कुंडलवाडी शहरात शेतकरी विरोधी कायदा;भारत बंदला प्रतिसाद

36

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.8डिसेंबर):- तालुक्यातील कुंडलवाडी येथे केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात लागु केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनेसह शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासह अन्य पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला दि.८ डिसेंबर रोजी कुंडलवाडी शहरात प्रतिसाद मिळाला.यात शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने सकाळपासुन ते दुपारपर्यंत आपापली प्रतिष्ठाने बंद होती.

तर शहरात मंगळवार हा आठवडी बाजार असल्याने दुपारनंतर सर्वच व्यवहार चालु केले.बंद यशस्वीपणे पार पडण्यासाठी नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेंद्र जिठ्ठावार,राजु पोतनकर,काँग्रेस शहराध्यक्ष प्रदिप अंबेकर, नगरसेवक शैलेश -याकावार,मुख्तार शेख,पोशट्टी पडकुटलावार,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सिराज पट्टेदार,शिवसेना शहरप्रमुख राहुल सब्बनवार,मियाँभाई खुरेशी,भीम पोतनकर,शरद करपे,गंगाप्रसाद कानकटे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.