अखेर पारध्यांचा बेटा ठरला कैद्यांचा मार्गदर्शक

38

✒️सुनिल भोसले(पुणे प्रतिनिधी)मो:-9146241956

पुणे(दि.9डिसेंबर):- नामदेव भोसले म्हणतात 9 पर्यत 14शाळा बदलल्या व 46 गावे भिक्षा मागुन खालेल.
आजुन मला आठवतो तो दिवस मी आरध्या भाकरी साठी वाढग माय सुरात गावतील लोकांच्या दारात तास तास उभ रहायचो परंतू मांनसाच्या आधी त्या घरापासून कुत्री मात्र भुकत भुकत हाकलुन लावायची ते लहान पणी भिक्षा मागणार पोर पुढे आदर्श समाजसेवक होत आणी आज साहित्यिक व आदिवासी समाजसेवक म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर छत्तीसगढ मधील आम्बिकापुर च्या जेल मध्ये जाउन कैद्याना मार्गदर्शन करते हा एक धडाच म्हणले तरी वागवे ठरणार नाही.

खरा देश भक्त तोच जो समाजाची नाळ जोडतो,
आयुष्यात निस्वार्थ पणे कांम केले की या निसर्गातील सर्व सुख समाधान आपल्या पदरा पडते, परंतू स्वार्थ या शब्दात दुःखाची दुरगंधी आपल्या जवळपास दरवळते.येथे प्रत्येकाने ठरवायचे अस्ते आपण कोणत्या शब्द पुष्पगुच्छाचा आधार घ्यावा….खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आरपावे या शब्दात साने गुरुजी सर्व काही सांगतात..
आज छत्तीसगढ येथील आम्बिकापुर केंद्रीय जेल मध्ये मार्गदर्शन मेळावा पार पडला या वेळी प्रमुख पाहुने म्हणून आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले बोलत होते,हा कार्यक्रम जेल मधील कार्यालयात मार्गदर्शन मेळावा पार पडला,या केंद्रीय जेल अंम्बिकापुर ,सरजा छत्तीसगढचे आम्बिकापुर जेलचे पोलीस अधीक्षक मा.राजेंद्र कुमार गायकवाड यांनी वेगवेगळ्या ठिकानी केलेल्या कांमाची माहिती आपल्या कवितेच्या रुपातून दिली.

पुढे जेल मधील कैद्याची ओळख परेड झाली त्यावेळेस जेल मधील कैद्यांनी तयार केलेल्या कांम पहाण्यात आले, या मध्ये विशेष म्हणजे एक मोठी पुस्तकाची लयाब्री आहे, पेंटींग प्रेस आहे,खादी उद्योग आहेत. या तयार करण्यात आलेली कपडे ही तयार झालेली कपडे बाहेर विक्रीसाठी जातात. येथे लाकडापासून वेग वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती केली जातात, या मधून कैदीना चांगला रोजगार मिळतो.

येथे आठवड्यातुन दोन वेळा कीर्तन .भजन गायन केले जाते या अशा संकृतीक कारेक्रमातुन मन परिवर्तन कारेक्रम केले जातात, यावेळी काही कैद्यानी सुंदर गाणी गावुन दाखवली त्या पैकी शांती प्रेम खेस आणि गुरुदयाल सिंग यांच्या गायणानी मन हेलावून गेले ,गुरुप्रित सिंग यांने जे गाने एकावले ते ऐकुन व त्याच्या आवाजा समोर अगदी चांगले गायक देखिल फिके पडतील असे वाटते, जिवन एकदाच आहे.परंतु राग, दोष, स्वार्थ, या मधून आपल्या हातुन जि काही झालेल्या चुका या मध्ये सर्व काही संपते माझ्या हातून जी चुक झाली याची सजा मी भोगत आहे.

असे एक शिव शेकर चेक्रास नावाचा कैदी बोलत होता तो पन्तीच्या हत्येत अजंन्म कारावास सजा भोगत आहे, तर काही जन म्हणे जर आम्हाला पंख असते तर येथुन उडुन बाहेरची दुनियेतील हवा पाहाण्यास मिळाली अस्ते, परंतू ते भाग्या आमंच्या वाट्याला नाही, आता झेलच आमंचे घर आणी येथील कैदी आमंचे भाउ येथील अधिकारी आमंचे पाहुणे.असे म्हणत प्रत्येकाचे डोळे पाणवले. या वेळी केंद्रीय जेल अंम्बिकापुरचे पोलीस अधीक्षक मा.राजेंद्र कुमार गायकवाड व ऑड सारंगधर सिंग याच्या हस्ते आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांचा प्रशासपत्र शाल श्रीफळ देउन गौरव करण्यात आला,