दिव्यांग शक्तीचा वतीने अपंग मेळावा संपन्न

41

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.9डिसेंबर):- जागतिक अपंग दिन ०३/१२/२०२० ते ०९/१२/२०२० दिव्यांग शक्तीच्या माध्यमातुन विविध कार्यक्रम घेऊन आज संपन्न झाला.या सप्ताहानिमीत्य आरोग्य तपासणी शिबीर औषधीसह विविध रुग्णालयाच्या माध्यमातुन घेण्यात आले यासह अपंग साहित्य नोंदणी,अंतोदय योजना ३५कि गरजु दिव्यांग बांधवांचे अर्ज, यासह अपंगप्रमाणपञ युडीआयडी कार्ड सह, तसेच मेळाव्याच्या माध्यमातुन अपंग बांधवांचा समस्यांचे निराकरण ,बंद असलेली पेंन्शन सह समाज कल्याण रेशनच्या समस्या, ग्रामपंचायत ५% निधी वितरणामध्ये अनियमीतता,दिव्यांग कायदा २०१६ची जनजाग्रुती,आॅनलाइन प्रमाणपञासह युडिआयडी कार्डची माहीती, आदी विषय बर्डे प्लाॅट, पोलिस चौकी जवळ या ठिकाणी मांडण्यात आले.

समारोपिय कार्यक्रमाला डाॅ गुलाबराव पवार, डाॅ जयंत सोनोने व डाॅ चेतन साटोटे,डाॅ नितिश अग्रवाल,डाॅ ज्ञानेश टिकार यांना सन्मानचिन्ह व पुष्प गुच्छदेऊन सत्कार करण्यात आला यावेळी सा,दिव्यांग शक्ती संपादक मनोज नगरनाईक,ऊद्योजक विनोदभाऊ डिडवाणीया,गुलजम्मा शहा,विनोद राऊत, कलीमभाई, अब्दुल रज्जाक हे मान्यवर ऊपस्थित होते कार्यक्रमाचे सुञसंचालन बेरोज्यासर तर आभार प्रर्दशन मो.शकिल शे.मलंग यांनी केले तर सुनिल जोशी,मधुकर पाटील,निरज सुराणा,वैभव देशमुख,अकील अहेमद शे ईदु बब्बु चौधरी,सलीमभाई यांनी यासाठी विशेष श्रम घेतले