भंगाराम तळोधी ते दरूर रोडच्या कामामुळे वाढतोय धुळीचे दुष्परिणाम

30

🔹पाण्याचा वापर न करता चालत आहे बिनधास्त काम.

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.9डिसेंबर):- तालुक्यातील भंगाराम तळोधी ते दरूर रोडचे काम चालू आहे. हा रोड बनविण्यासाठी अनेक गाड्यांचा वापर केला जातो. हा रोड बनविण्याकरिता लागणारे मुरूम, गिटी तसेच इतर माल आणण्यासाठी मोठ्या गाड्यांचा वापर केला जात आहे. या गाड्या माल आणण्याकरिता दिवसभर गावातून येणे-जाने करतात. गाड्यांपासून निघणार्या धुळांमुळे लोकांना त्रास किंवा रोग न व्हावा याकरिता दिवसातून ३-४ वेळा पाणी मारायला पाहिजे.

मात्र इथे मात्र ना कुणाची काळजी आणि ना कुणाची भीती, ठेकेदाराने बिनधास्त पाणी न मारता काम करत आहेत. आधीच कोरोनाचे संकट आणि यात हवेचे दुष्परिणाम, यामुळे लोकांचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे. रोडच्या बाजूच्या दुकानदारांनी तर दुकान चालवावे कि बंद करावे असा प्रश्नच पडला आहे. त्यामुळे तहसीलदार साहेबांना गावातील लोकांनी विनंती केली आहे कि यावर लक्ष द्यावे व याच्यावर योग्य ती कार्यवाही करून आम्हाला याचा काही त्रास किंवा रोग होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.