पत्रकार यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी पुसद येथे नोंदवला निषेध

34

🔸संपादक व पत्रकार यांनी उपविभागीय अधिकारी पुसद यांना केले निवेदन सादर

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.10डिसेंबर):-उमरखेड़, पुसद, वाशिम जिल्हात मोठ्या प्रमाणात अवैध रित्या रेती तस्करी करून रेती माफिया अमाप पैसे कमवित असून प्रशासनातील काही फुकट खाउ त्याची मद्त करीत आहेत, या अवैध रेती तस्करी च्या रेती चोरी च्या अवैध व्यवसायत कोणी आडसर झाल्यास त्यास हटविन्यास ही रेती माफिया मागे पुढे पाहत नाही आहेत.

दोन दिवसा पूर्वी शेन्दूरजना आढव येथे रेती चोरुंन खाली करीत आस्ताना RNN NEWS मराठी चे प्रतिनिधी पत्रकार प्रमोद आड़े यांनी रेती चोरी व ट्रैक्टर चा वीडियो बनविला म्हणून शेन्दूरजना येथील रेती माफिया यानी पत्रकार प्रमोद आड़े वर भ्याङ हल्ला करून जबर मारहाण केली व गाड़ी ने उडून मारण्याची धमकी दिली.

पत्रकरावर वारंवार हल्ले होत असुन यावर अंकुश लावणे गरजे चे आहे, सदर प्रकरणी गुन्हे नोद झाले परंतु अटक केली नाही, रेती व ट्रेक्टर जप्त केले, त्यामुळे तपास संशयास्पद वाटतो, पत्रकार प्रमोद अड़े यांच्यावर हल्ला करणारे आरोपी यांना कड़क शिक्षा होऊन रेती चोरी चे चार ही ट्रेक्टर शासन जमा करावे तसेच पत्रकार सरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणून पुसद येथिल सर्व संपादक पत्रकार व संघटना नि RNN NEWS मराठी चे पत्रकार प्रमोद आड़े यांच्यावर झालेल्या भ्याड़ हल्ल्याचा निषेध करीत उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन दिले.