महाराष्ट्र राज्य मल्हार सेनेच्या सरसेनापती पदी बबन रानगे यांची फेरनिवड

    47

    ✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    कोल्हापूर(दि.10डिसेंबर):- महाराष्ट्र राज्य मल्हार सेनेच्या सरसेनापती पदी वाशी ता.करवीर येथील माजी पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव रानगे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली.धुळे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र  धनगर समाज प्रदेश कार्यकारिणीची बैठक धनगर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी ग्रामविकास मंत्री आण्णा डांगे माजी आमदार अँड. रामहरी रुपनर यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी बैठकीत बबन रानगे यांची मल्हार सेनेच्या सरसेनापती पदी तिसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. 

    यावेळी माजी आमदार रामराव वडकुते, चिमनभाऊ डांगे, श्रीरामभाऊ पुंडे, डॉ.अलकाताई गोडे, सुनील वाघ ,सुभाष सोनवणे, संतोष धनगर, उमेश घुरडे, पुष्पाताई गुलवाडे, युवराज गोडे ,बयाजी शेळके, राघू हजारे ,बाळासाहेब दाईंगडे, छगन नांगरे याच्यासह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
    यावेळी बबनराव रानगे म्हणाले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मल्हार सेनेची शाखा निर्माण केल्या महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा नाही जिथं मल्हार सेना नाही अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी जिल्हा अहमदनगर येथे अहिल्यादेवी भव्य स्मारक उभारण्या मध्ये मल्हार सेनेचा वाटा आहे.

    महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक वेळा वेगवेगळ्या आंदोलने करून परिषदा घेऊन समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक वर्षी महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे धनगर समाजाचा प्रमुख प्रश्न अनुसूचित जमाती ची अंमलबजावणी करून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येत्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे वेळ पडल्यास रस्त्यावरील लढाई तीव्र करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये दिलेले आरक्षण या समाजाला का दिले जात नाही याचा जाब येत्या काळामध्ये शासनाला द्यावा लागेल यासाठी प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया दिली.