ब्रम्हपुरी येथील लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्थेचा विशेष उपक्रम

76

🔹कु.पूनम कुथे यांच्या वाढदिवसा निमित्त गरीब गरजूंना कपडे ब्लँकेट्स वाटप

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.१०डिसेंबर):- गुरुवारला ब्रम्हपुरी शहरातील सामाजिक कार्य करणारी लाईफ फाऊंडेशन संस्थेच्या, महिला सचिव कु.पुनम नानाजी कुथे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रम्हपुरी परिसरातील गोपाळ आणि भटके समाजातील लोकांना आज सकाळी ११ वाजता थंडीचे उबदार कपडे, ब्लँकेट्स, बिस्कीट्स, चिप्स पॉकेट्स देण्यात आले. सोबतच त्या लोकांशी हितगुज घालत कु.पुनम कुथे यांनी केक कापून स्वतःच वाढदिवस साजरा केला.

या उपक्रमा प्रसंगी संस्थेचे सहसचिव विपुल शेंडे, अध्यक्ष उदयकुमार पगाडे, सदस्य श्रुती मेश्राम, अंकिता कोरेकर, निशिकांत बावनकुडे, भूषण आंबोरकर,प्रशांत खोब्रागडे यांनी सहकार्य केले.या उपक्रमा बाबतीत सर्वत्र कौतुक केले जात आहे.