श्रीगुरूदेव सेवक पुरुषोत्तम हिरादेवे यांच्या स्मृति प्रित्यर्थ राष्ट्रसंत साहित्याचे वितरण

32

✒️कोरपना(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बाखर्डी(दि.10डिसेंबर):- चे माजी पोलीस पाटील,श्रीगुरुदेव कृषीसेवा पुरस्काराचे मानकरी दिवंंगत पुरूषोत्तमजी हिरादेवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ काल गुरुकुंज आश्रमात केलेल्या अस्थी विसर्जनानिमित्ताने बाखर्डी येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,श्री.बापुजी बोबडे,लक्ष्मणराव कुटेमाटे,सुरेश खुसपुरे,प्रभाकर देवतळे, ॲड.राजेंद्र जेनेकर,सुरेश कोल्हे,विपीन वासाडे,विनोदराव ढुमणे, चिमनदास काकडे,विलास कळसकर,खुशाल गोहोकार,पुंडलिक टोंगे,भाऊराव दुधलकर,मुर्लीधर निमकर, बबनराव देवतळे आदी मान्यवरांचे उपस्थितीत ६८ वयाचे औचित्य साधून त्यांचे सुपुत्र लक्ष्मीकांत हिरादेवे,प्रफुल्ल हिरादेवे यांचे हस्ते ६८ ग्रामगीता ग्रंथाचे वितरण करण्यात आले.हिरादेवे परिवाराच्या वतीने त्यांच्या दैनंदिन वस्तू जसे पेन,भगवी टोपी, ग्रामगीता,भगवदगीता, चष्मा , मिळालेले पुरस्कार-सन्मान,पोलिस पाटील म्हणून मिळालेले ओळखपत्र,त्यांनी केलेला पत्रव्यवहार आदी जतन करून ठेवण्याचा प्रयत्न कार्यक्रमात करण्यात आला.

याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले की, दिवंगताच्या वस्तु जतन करुन ठेवणे आणि त्यांच्या केलेल्या सत्कार्याचा वसा पुढे चालविणे , ही बाब इतरांसाठी प्रेरक ठरणारी आहे . त्यांनी हिरादेवे परिवाराचे कौतुक केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता प्रज्वल देवतळे,ओम हिरादेवे, आसावरी हिरादेवे,प्रगती जेनेकर आदींनी परिश्रम घेतले.